विशेष प्रतिनिधी
ठाणे : ठाण्यात मालमत्ता करमाफीचे शिवसेनेकडून जनतेला गाजर दाखविण्यात आले आहे. शिवसेनेचा हा ‘चुनवी जुमला’ असल्याचा हल्लाबोल भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे. Property tax exemption in Thane Carrots from Shiv Sena to the people
मनोहर डुंबरे म्हणाले, महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंत पूर्णपणे मालमत्ता कर माफ आणि ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात अंशत: सवलत देण्याचे वचन दिले होते. मात्र, सत्ता मिळविल्यावर पावणेपाच वर्षांपासून वचनाचा विसर पडला. आता निवडणुकीला तीन महिने राहिल्यानंतर शिवसेनेला जाग आली. घाईघाईने महासभेत करमाफीचा ठराव मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यात शिवसेनेचेच सरकार आहे. या सरकारने महिनाभरात ठरावाला मंजुरी द्यायला हवी. अन्यथा, हा शिवसेनेचा `चुनावी जुमला’च ठरेल, हे नक्की. गेल्या ५ वर्षांपासून भाजपाने सतत आंदोलन व इतर माध्यमातून पाठपुरावा केल्यामुळे शिवसेनेला आज करमाफीचा निर्णय घ्यावाच लागला, असे त्यांनी सांगितले.
Property tax exemption in Thane Carrots from Shiv Sena to the people
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी