आपल्या मातीमधील या खेळाला सर्वदूर पोहचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात आता प्रो कब्बडी प्रमाणेच प्रो गोविंदा स्पर्धा रंगणार आहे. यामुळे राज्यभरातील गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवण्यासाठी गोविंदानी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चनला ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनवण्यात आल्याने, या स्पर्धेचं आकर्षण अधिकच वाढलं आहे. Pro Govinda tournament to be held in Maharashtra; Bollywood star Abhishek Bachchan will be the brand ambassador
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शासन आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रो गोविंदा २०२३ या स्पर्धेला शुभेच्छा देत, स्पर्धेत सहभागी झालेल्या गोविंदांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला. तसेच, प्रो कबड्डी प्रमाणेच यावर्षीपासून प्रो गोविंदा ही स्पर्धा राज्यात सुरू झाली असून आपल्या मातीमधील या खेळाला सर्वदूर पोहचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर वरळीत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या प्रो-गोविंदा या स्पर्धेसाठी यापुढे बॉलिवूड अभिनेते अभिषेक मोदी हे ब्रँड अॅम्बेसिडर असतील असे यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले.
यासमयी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा मंत्री बनसोडे, खासदार श्रीकांत शिंदे, बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रविंद्र पाठक, माजी नगरसेवक आणि प्रो-गोविंदाचे आयोजक पुरवेश सरनाईक आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेली अनेक गोविंदा पथके उपस्थित होती.
Pro Govinda tournament to be held in Maharashtra; Bollywood star Abhishek Bachchan will be the brand ambassador
महत्वाच्या बातम्या
- नेहरूंचा इंदिराजींनी सोडून दिलेला वारसा मोदी पुढे घेऊन जातायेत, तरी काँग्रेससह सर्व विरोधकांचा आक्षेप??
- मुंबईत “इंडिया” आघाडीचा “मास्टर स्ट्रोक”; तर दिल्लीत मोदींचा “ग्रँडमास्टर स्ट्रोक”!!
- मराठमोळे अजय पुरकर आता टॉलीवूड गाजवणार ! दक्षिणात्य हिरो व्हीलन समोर मोठ आवाहन!
- संसदेच्या विशेष अधिवेशनातून विरोधकांना “भूल”, की “एक देश एक निवडणुकीची” चाहूल?