• Download App
    स्मशानभूमीजवळचे प्रदूषण रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरा ; मुंबई उच्च न्यायालयाची राज्यातील सर्व पालिकांना सूचना |prevent pollution near the cemetery Use modern technology; Notice of Mumbai High Court to all Municipalities in the State

    स्मशानभूमीजवळचे प्रदूषण रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरा ; मुंबई उच्च न्यायालयाची राज्यातील सर्व पालिकांना सूचना

    वृत्तसंस्था

    मुंबई : स्मशानभूमीजवळचे प्रदूषण रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व पालिकांना केली आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. prevent pollution near the cemetery Use modern technology; Notice of Mumbai High Court to all Municipalities in the State

    पुण्यातील काही स्मशानभूमींमध्ये सध्या एकाच दिवशी ८० हून अधिक अंत्यसंस्कार होत आहेत. राज्यातील अन्य स्मशानभूमींमध्ये कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीवरील चिमणीची उंची कमी आहे.



    त्यातच सततच्या अत्यंसंस्कारांमुळे धुराचे लोट, राख स्मशानभूमी परिसरात पसरत आहे. त्या प्रदूषणामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाबत विक्रांत लाटकर यांनी अ‍ॅड्. असीम सरोदे  व अ‍ॅड्. अजिंक्य उडाणे यांच्यामार्फत उच्च न्यायालयत जनहित याचिका दाखल केली आहे.

    मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी अनेक स्मशामभूमींच्या चिमण्या या कमी उंचीच्या असून मृतदेह जाळल्याने त्यातून बाहेर पडणारा धूर आसपासच्या पसरतो. त्यामुळे हवेत प्रदूषण होत आहे, असे याचिकेत नमूद केले आहे.

    पुणे पालिकेचे वकील अभिजीत कुलकर्णी यांना या प्रकरणी उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्याच वेळी सध्या सर्वच पालिकांनी अंत्यसंस्कांरामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानता वापर करता येईल का ? याचा विचार करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

    prevent pollution near the cemetery Use modern technology; Notice of Mumbai High Court to all Municipalities in the State

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, वारसा नाही, उद्धव ठाकरेंवरही निशाणा

    Supriya Sule : सुळेंनी केला मोठा खुलासा- शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार का? रोहित पवार राज्यात, तर सुप्रियाताई केंद्रात मंत्री होणार का?

    महाराष्ट्रात निवडणुका महापालिकांच्या; पण पवारांच्या पासून हिजाब पर्यंत पंतप्रधान पदाची चर्चा!!