• Download App
    संयुक्त राष्ट्र संघाचे अध्यक्ष म्हणून पत्र लिहिले, तरी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न अपूर्णच; काकांचा पुतण्याला टोला|President of the United Nations, the dream of the post of Chief Minister remained unfulfilled; Uncle to nephew

    संयुक्त राष्ट्र संघाचे अध्यक्ष म्हणून पत्र लिहिले, तरी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न अपूर्णच; काकांचा पुतण्याला टोला

    प्रतिनिधी

    मुंबई :  महाराष्ट्राच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्र संघाचे अध्यक्ष म्हणून पत्र लिहिले, तरी त्यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न अपूर्णच राहील, असा टोला काकांनी पुतण्याला हाणला.President of the United Nations, the dream of the post of Chief Minister remained unfulfilled; Uncle to nephew

    अकोल्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी भाजपविरोधात जे एकत्र येतील त्यांना सोबत घेऊ, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांना मधाचे बोट लावले. त्यांना “इंडिया” आघाडीत घेण्याचे सूतोवाचही केले. पण या पत्रकार परिषद शरद पवारांनी मुख्य टोला हाणला तो अजित पवारांनाच!!



    भाजपला अजित पवारांना मुख्यमंत्री करायचेच असेल, तर सहा – आठ महिन्यांसाठी नाही, तर पाच वर्षांसाठी करेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर शरद पवारांनी फडणवीसांपेक्षा अजितदादांनाच टोला हाणला. अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार आहे. ही न घडणारी गोष्ट आहे. अजित पवार यांना निवडणुकीत स्वीकारायचे की नाही हे लोकच ठरवतील, असेही पवार म्हणाले.

    शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेऊन अजित पवार शिंदे – फडणवीस सरकार मध्ये सामील झाले, त्याला 100 दिवस पूर्ण झाले. त्या निमित्ताने अजितदादांनी महाराष्ट्रातल्या जनतेला उद्देशाने पत्र लिहिले. या पत्राची शरद पवारांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले की, यूएन म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष म्हणून जरी पत्र लिहिले तरी हरकत नाही, पण ते मुख्यमंत्री होणार नाहीत!!

    भुजबळांनी खोट बोलल्याचे मान्य केले

    यावेळी छगन भुजबळांनी केलेल्या आरोपांवरदेखील पवारांनी पलटवार करत भुजबळांनी खोट बोलल्याचे मान्य केले. सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव हा भुजबळांचा होता. पण त्यांनी स्वीकारला नसल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. त्यापुढची जी पायरी होती ती आम्हाला कोणाला मान्य नव्हती असे म्हणत आपण खोटे बोलल्याचे भुजबळांनी मान्य केल्याचा दावा पवारांनी केला.

    भाजपविरोधात सर्वांना सोबत घेणार 

    भाजपविरोधात बंड पुकारत देशभरातील प्रमुखपक्षांनी “इंडिया” आघाडीची स्थापना केली आहे. यात पुढील काळात कोणा कोणाचा समावेश होणार??, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले की, भाजपाविरोधात जे सोबत येतील त्यांना घेऊन “इंडिया” आघाडी लढणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमची तीन पक्षाची आघाडी आहे. यात काही आणखी शेतकरी कामगारपक्षासारखे पक्षही येतील असे यावेळी पवारांनी स्पष्ट केले.

    President of the United Nations, the dream of the post of Chief Minister remained unfulfilled; Uncle to nephew

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!