विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोकण,गोव्यासह महाराष्ट्रात काही ठिकाणी २१ ते २३ एप्रिलदरम्यान विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊस व गडगडाटी आकाश राहील. अवकाळी पावसाचा फटका उन्हाळी पिकांना बसण्याची शक्यता आहे. Premature till 23rd in Konkan, Central Maharashtra
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील तीन दिवस अशी परिस्थिती राहिल. समावेश आहे. आता दुसरीकडे बहुतांश भागांना २३ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यात भागात वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहील.
२३ एप्रिल रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात अवकाळी पाऊस होईल. तर २१,२२ एप्रिलला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर भागात हवामान बदलेल.
दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असतानाच, विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली. तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातही काहीशी वाढ झाली.
Premature till 23rd in Konkan, Central Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- Loudspeaker Controversy : लाऊडस्पीकर वादावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा इशारा, म्हणाले- मशिदीवरील भोंगे काढले तर आम्ही आंदोलन करू!
- Delhi Violence : जहांगीरपुरी दंगलीतील 5 आरोपींवर रासुका, बंदी घातलेली संघटना PFIच्या कनेक्शनचीही चौकशी
- रुपाली चाकणकर म्हणतात गणेश नाईक यांना होणार अटक, बलात्काराचा गुन्हा दाखल
- राजस्थान सरकारचा गोपालकांसाठी जिझिया कर, गायी पाळण्यासाठी घ्यावा लागणार परवाना, कानावर लावावा लागणार टॅग