• Download App
    भेंडवळ घटमांडणीचे भाकीत; ऑगस्टनंतर भरपूर पाऊस पडणार, अतिवृष्टीचीही शक्यता, शेतकऱ्यांसाठी चांगले जाणार वर्ष|Predictions of Bhendval Constitution; After August, there will be a lot of rain, there is a possibility of heavy rain, it will be a good year for farmers

    भेंडवळ घटमांडणीचे भाकीत; ऑगस्टनंतर भरपूर पाऊस पडणार, अतिवृष्टीचीही शक्यता, शेतकऱ्यांसाठी चांगले जाणार वर्ष

    विशेष प्रतिनिधी

    बुलडाणा : भेंडवळची घटमांडणी आज शनिवारी पहाटे सहा वाजता जाहीर करण्यात आली. यामध्ये पाऊस आणि शेती पिकांबाबत मोठे भाकीत कण्र्यात आले आहे. यंदा देशाचा राजा कायम राहणार आहे. तसेच चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे. याच घटमांडणीला भेंडवळचे भाकीत म्हणतात. दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहत असतात.Predictions of Bhendval Constitution; After August, there will be a lot of rain, there is a possibility of heavy rain, it will be a good year for farmers



    खरीप पिके साधारण राहतील

    चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही घट मांडणी करण्यात आली. यानंतर घट मांडणीतील भाकित वर्तवण्यात आले आहे. यंदा देशाचा राजा कायम राहील. चांगला पाऊस होईल, तर खरीप पिके साधारण राहतील. याशिवाय रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगले राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    ऑगस्टनंतर भरपूर पाऊस पडण्याचा अंदाज

    विशेषतः यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगले जाणार आहे. भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार, यंदा जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल. जुलैमध्ये चांगला पाऊस होईल. तर ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढेल. सप्टेंबर महिन्यात अवकाळीसारखा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच सुरुवातीचे दोन महिने सामान्य पाऊस असेल. तर ऑगस्टनंतर भरपूर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता

    एवढेच नव्हे तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. यावर्षी खरीप पिके साधारण राहणार आहेत. त्यात करडी, मटगी, मसूर, तूर, बाजरी, हरबरा, मुंग व उडीद हे पिके साधारण येतील. त्यानंतर या पिकांवर रोगराईचा प्रभाव जास्त असेल. पिकांची नासाडी देखील होईल, असेही भाकित वर्तवण्यात आले आहे.

    300 वर्षांपासून घटमांडणी

    याशिवाय रब्बी पिकांमध्ये यंदा गहू पिक सर्वात चांगले राहील, असे भाकित देखील वर्तवण्यात आले आहे. आचारसहिंता सुरू असल्याने यंदा कोणतीही राजकीय भविष्यवाणी करण्यात आलेली नाही. 300 वर्षांपासून ही घटमांडणीची परंपरा सुरू आहे. त्यानुसार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळ गावाबाहेर एका शेतात घट मांडणीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यात 18 प्रकारचे धान्य आणि गोल खड्डा करून त्यात मटकी ठेवली जाते. रात्री ज्या हालचाली होतील, त्याचे निरीक्षण करून दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवले जाते. शनिवारी सकाळी सूर्योदयावेळी या घटमांडणीचे निरीक्षण करून अंदाज जाहीर करण्यात आले. या भेंडवळच्या घट मांडणीवेळी अनेक शेतकरी उपस्थित होते.

    Predictions of Bhendval Constitution; After August, there will be a lot of rain, there is a possibility of heavy rain, it will be a good year for farmers

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!