विशेष प्रतिनिधी
मुंबई :मुख्यमंत्र्यांनी भावनिक बोलून एसटी कर्मचारी यांचा प्रश्न सुटणार नाही. अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिली आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.Praveen Darekar’s criticism that Shiv Sena stood up by the lives of many Shiv Sainiks
दरेकर म्हणाले, राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांवर जुलमी स्वरुपाची कारवाई सुरू आहे. एसटी बंद करुन खाजगी बसेस सुरु करत आहेत. यातून काही मलिदा लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे का? एका बाजूला एसटी बंद ठेवायची आणि दुसरीकडे खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन द्यायचे, हे चुकीचे आहे.
भाजपला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कुणाची पोळी भाजण्याची गरज नाही. कोणतीही इच्छा असेल तर सर्व काही करता येईल. महाराष्ट्रातील एसटी महामंडळ हे देशातील सर्वात मोठे महामंडळ आहे. त्यात काही लिकेजस आहेत. ते व्यवस्थित केले तर सर्व काही व्यवस्थित करता येईल, असे दरेकर यांनी सांगितले.
दुसरीकडे, नवाब मलिक यांच्यावर अनेक दावे पडलेले आहेत. ज्यांना अब्रुच नाही त्यांच्या अब्रू नुकसानी संदर्भात काय बोलायचे, असा टोला दरेकर यांनी यावेळी बोलताना लगावला.राज्य सरकारने आतापर्यंत ९१८ हून अधिक कर्मचाºयांना निलंबित केले आहे. तरीही संप मागे घेण्यास कर्मचारी तयार नाहीत.
आता या आंदोलनाची धग मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पोहचली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंनी सुरुवातीला शिष्टमंडळाला मी आत्महत्या करणाऱ्यांचे नेतृत्व करत नाही. आधी आत्महत्या थांबवा, ही माझी अट आहे असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
Praveen Darekar’s criticism that Shiv Sena stood up by the lives of many Shiv Sainiks
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात कोणता उमेदवार भाजप उभा करणार?
- आंदोलनात सहभागी झालेल्या सांगली मधील वाहक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमूळे खळबळ
- पक्षी निरीक्षण : रंकाळा तलाव पक्षी प्रेमींना खुणावतेय, विविध 43 प्रजातींची नोंद
- आता अमृता फडणवीस यांनीही नवाब मलिकांना पाठवली मानहानीची नोटीस, म्हणाल्या- ४८ तासांत माफी मागा!
- सावरकर प्रेमींच्या संतापानंतर नाशिकच्या साहित्य संमेलन गीतात झाला बदल!!