विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने दुहेरी खेळी केली मुंबईत त्यांनी काँग्रेस बरोबर युती केली पण उल्हासनगर मध्ये सत्तेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी शिंदे सेनेबरोबर आघाडी केली.Prakash Ambedkar’s Vanchit Aghadi plays a double Alliance with Congress in Mumbai, but alliance with Shinde Sena in Ulhasnagar
उल्हासनगर महालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या सुरेखा सोनवणे आणि विकास खरात या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा जाहीर केला. त्या दोन्ही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. या पाठिंब्यासाठी दोन्ही नगरसेवकांचे आभार मानले. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक योगेश जानकर, प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते.
उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि शिंदे सेना स्वतंत्र लढले होते. पण यापैकी कुणालाही बहुमत मिळाले नव्हते. भाजपचे 37 नगरसेवक निवडून आले तर शिंदे सेना आणि साई आघाडी यांचे 36 नगरसेवक निवडून आले. एकूण 78 सदस्य असलेल्या महापालिकेत बहुमताचा आकडा 40 आहे. महागठबंधनचे दोन नगरसेवक निवडून येऊन त्यांनी शिंदे सेनेला पाठिंबा दिला त्यांच्या पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी सुद्धा शिंदे सेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे उल्हासनगर मध्ये शिंदे सेना भाजपवर वरचढ ठरली. शिंदे सेना आणि पप्पू कलानी यांची साई आघाडी यांचे मिळून 36 नगरसेवक त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देणारे चार नगरसेवक मिळून त्यांचा आकडा 40 वर पोहोचला. त्यामुळे उल्हासनगर मध्ये भाजपवर मात करून शिंदे सेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला.
महत्त्वाचे म्हणजे मुंबईत काँग्रेस बरोबर युती करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी उल्हासनगर मध्ये मात्र शिंदे सेनेचा सत्तेचा मार्ग मोकळा केला.
Prakash Ambedkar’s Vanchit Aghadi plays a double Alliance with Congress in Mumbai, but alliance with Shinde Sena in Ulhasnagar
महत्वाच्या बातम्या
- दोन पवार एकत्र येतील, पण ते पुणे जिल्हा परिषदेच्या पलीकडे जातील का??
- झ्युरिक मधल्या विवानचे फडणवीस झाले फॅन; लाडक्या बहिणींबरोबरचा फोटो आणि व्हिडिओ देखील केला शेअर!!
- CM Devendra Fadnavis : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना
- Trump : ट्रम्प यांनी 8 युरोपीय देशांवर 10% टॅरिफ लावले, ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यास विरोध करत होते