• Download App
    पवारांचे तळ्यात मळ्यात, काँग्रेसनेही राखले अंतर; पण प्रकाश आंबेडकरांची भाजप विरोधात भूमिका कठोर!!Prakash Ambedkar's stand against BJP is tough

    पवारांचे तळ्यात मळ्यात, काँग्रेसनेही राखले अंतर; पण प्रकाश आंबेडकरांची भाजप विरोधात भूमिका कठोर!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्यातले उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवारांची “गुप्त” नसलेली भेट घेतल्यानंतर शरद पवारांनी आपण “इंडिया” आघाडी सोबतच असल्याचा सांगोल्यात खुलासा केला. पण तरीही त्यांच्या तळ्यात मळ्यात भूमिकेविषयी महाराष्ट्रात अजूनही संशय आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वतःची तयारी चालवली आहे. तरीही इतर घटक पक्षांना किंवा नव्या मित्र पक्षांना बरोबर घेण्याची काँग्रेसची तयारी दिसत नाही. Prakash Ambedkar’s stand against BJP is tough

    या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी मात्र भाजप विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पुण्यात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर जोरदार तोफा डागल्या. मोदी सरकारने विभाजन विभीषिका दिवस सरकारी पातळीवर पाळण्याचे ठरविल्यानंतर त्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांनी कठोर टीका केली. संघाचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला. संघाचा अजेंडा पूर्ण करण्यासाठीच मोदी सरकारने विभाजन विभीषिका दिवस सरकारी पातळीवर पाळण्याचे ठरविले, असा आरोपही त्यांनी केला. संघ म्हणजे हेडगेवार, गोळवलकर, सावरकर आणि गोडसे अशा प्रतिगामी व्यक्तींचे प्रतिबिंब आहे. संघ स्वतःला बदलतो असे सांगितले जात असले तरी त्यांनी त्याचे पुरावे दिलेले नाहीत. त्यांनी गोडबळकरांचे बंच ऑफ थॉट्स या पुस्तकातला काही भाग जाळून दाखवावा मग मान्य करता येईल की संघ बदलला, असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केला.

    – आंबेडकरांच्या कठोर भूमिकेमागचे कारण

    प्रकाश आंबेडकरांनी संघ आणि भाजप विरोधात एवढी कठोर भूमिका घेण्यामागे त्यांची स्वतःची काही राजकीय कॅल्क्युलेशन्स आहेत. एकीकडे शरद पवारांचे मोदी प्रेमातून झालेले राजकीय तळ्यात मळ्यात, दुसरीकडे काँग्रेस स्वतंत्र मार्ग आखताना प्रकाश आंबेडकरांना विशेष अंतरावरच ठेवत आहे. उद्धव ठाकरेंबरोबर वंचित बहुजन आघाडीची युती जाहीर झाली असली तरी त्यांचे संयुक्त मेळावे अजून होत नाहीत. या पार्श्वभूमीवर विरोधकांमधली स्वतःची पॉलिटिकल स्पेस वाढवण्यासाठी प्रकाश आंबेडकर भाजप आणि संघ यांच्या विरोधात कठोर भूमिका घेत आहेत.


    सुप्रिया सुळेंच्या सुरात प्रकाश आंबेडकरांचा सूर; मोदींना दिले 70000 कोटींच्या भ्रष्टाचाराबद्दल पवारांवर गुन्हे दाखल करण्याचे आव्हान!!


     

    महाराष्ट्रातले इतर विरोधक विशिष्ट राजकीय संभ्रमावस्थेत असताना किमान राजकीय भूमिकेच्या पातळीवर तरी आपणच संघ आणि भाजपचे कट्टर विरोधक आहोत हे दाखवून दिले तर, त्याचा मतांच्या रूपात मोठा लाभ आपल्याला मिळू शकतो, असा प्रकाश आंबेडकरांचा होरा आहे. दलितांमधली 12% आणि मुस्लिमांमधली 14 % मते एकत्र करून महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाण्याचा त्यांचा इरादा त्यांनी बोलून दाखविला आहे. ते अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी दलित आणि मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या हेतूनेच प्रकाश आंबेडकर इतर विरोधकांपेक्षा भाजप आणि संघ विरोधात कठोर भूमिका घेत आहेत.

    आता प्रकाश आंबेडकर यांची ही स्ट्रॅटेजी असली तरी ती महाराष्ट्रात ही स्ट्रॅटेजी फलद्रूप होण्यात भरपूर अडथळे आहेत. ते अडथळे सर्व विरोधकांच्या संघटनात्मक ताकदींचे आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मधले दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गट यांची संघटनात्मक ताकद स्वतंत्रपणे आणि एकत्रितही प्रकाश प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी पेक्षा निश्चितच जास्त आहे. त्यामुळे हे सर्व विरोधी पक्ष स्वतःची विशिष्ट “पॉलिटिकल स्पेस” सोडून त्यात प्रकाश आंबेडकरांना सामावून घेतील ही शक्यताच फार कमी आहे.

    म्हणूनच प्रकाश आंबेडकरांनी आपणच महाराष्ट्रातले कट्टर संघ आणि भाजप विरोधक आहोत हे दाखविण्याचा कठोर भूमिकेतून प्रयत्न चालवला आहे. आता या प्रयत्नांना किती यश मिळते?, हे त्यांच्या अकोला मतदारसंघातल्या लोकसभा निवडणूक लढवल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

    Prakash Ambedkar’s stand against BJP is tough

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!