• Download App
    प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला दणका; वंचितचे 3 उमेदवार परस्पर जाहीर करून महाराष्ट्रात वाजवला "डंका"!!|Prakash Ambedkar's blow to Mahavikas Aghadi; "Danka" was sounded in Maharashtra by announcing 3 candidates of the deprived party mutually!

    प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला दणका; वंचितचे 3 उमेदवार परस्पर जाहीर करून महाराष्ट्रात वाजवला “डंका”!!

    विशेष प्रतिनिधी

    अकोला : एकीकडे महाविकास आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर एकमेकांना चर्चेच्या फेऱ्यांमध्ये गुंतवत राहिले असताना या चर्चेच्या फेऱ्याच्या गुंत्यातून आपला पाय बाजूला काढत प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीसाठी परस्पर 3 उमेदवार जाहीर करून महाविकास आघाडीला दणका दिला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार नसणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.Prakash Ambedkar’s blow to Mahavikas Aghadi; “Danka” was sounded in Maharashtra by announcing 3 candidates of the deprived party mutually!



    प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीची अद्याप महाविकास आघाडीशी पूर्णपणे युती झालेली नाही, असे पुन्हा एकदा स्पष्ट केले होते. तसेच त्यांनी आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहन केले होते. पण त्यानंतर लगेचच त्यांनी हा निर्णय देखील घेतला आहे.

    प्रकाश आंबेडकर यांनी आज (3 मार्च) अकोल्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्या पक्षाच्या लोकसभेच्या 3 जागांवरील उमेदवार जाहीर केले. यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून लढणार आहेत, तर वर्धा येथे राजेंद्र साळुंखे आणि सांगलीतून चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

    यावेळी प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीची युती होणार का??, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आम्ही देखील याबाबत अद्याप संभ्रमात आहोत. आम्ही आघाडीचा भाग आहोत की नाही हेच आम्हाला कळत नाही. आमची ताकद असलेल्या जागांची माहिती आम्ही महाविकास आघाडीला दिली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीने 15 जागा ओबीसी आणि तीन अल्पसंख्याकांना द्याव्यात, असेही सांगितले आहे. मात्र, महाविकास आघाडीतील नेत्यांकडून माध्यमांमध्ये हे आमच्या अटी असल्याचे सांगितलं. तसेच कार्यकर्ते हे उत्साही असतात. त्यामुळे पक्षात भांडण वाढू नये, डोकेदुखी वाढू नये म्हणून मी महाविकास आघाडीच्या बैठकीला जाऊ नका. असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

    Prakash Ambedkar’s blow to Mahavikas Aghadi; “Danka” was sounded in Maharashtra by announcing 3 candidates of the deprived party mutually!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस