• Download App
    Prakash Ambedkar प्रकाश आंबेडकर म्हणाले- राहुल गांधी

    Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले- राहुल गांधी दुटप्पी, ते बोलतात एक आणि त्यांचा पक्ष करतो दुसरेच

    Prakash Ambedkar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Prakash Ambedkar आगामी विधानसभा निवडणुकीत ‘संविधान बचाव’ नाही, तर ‘आरक्षण बचाव’ हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर  ( Prakash Ambedkar  ) यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदार इंडिया आघाडीकडे वळले होते. विधानसभा निवडणुकीत या दोन्ही समुदायांची मते वंचितकडे पुन्हा येतील, असा दावाही त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला. यावेळी त्यांनी आपला जुना सहकारी पक्ष एमआयमएमवरही टीका केली. एमआयएम प्रामाणिक पक्ष नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.Prakash Ambedkar



    गत लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमची युती होती. मात्र, विधानसभेला कोणत्याही आघाडीत सहभागी न होण्याचा निणर्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, 2019 पर्यंत आमच्याबरोबर अनेक ओबीसी संघटना होत्या. एमआयएम हा प्रामाणिक पक्ष नव्हता; त्यांनी पळ काढला. आमचे मुस्लिम बांधवाशी थेट संबंध आहेत. त्यामुळे अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला इतर पक्षांची गरज नाही. आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी 20 मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले आहे. मागच्या 70 वर्षांत मुस्लिमांना पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले असल्याचे आंबेडकर म्हणाले.

    यंदाची निवडणूक जरांगे आणि वंचितमधे होणार

    महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या कुणाचे पारडे जड आहे या प्रश्नावर उत्तर देताना आंबेडकर म्हणाले, महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष धोरण ठरवित नाहीत. त्यामुळे यंदाची निवडणूक मनोज जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये होणार आहे. . जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू केले आहे. तर, ओबीसींकडून याला विरोध केला जात आहे. त्यामुळे दोन गट तयार झाले आहेत. मराठा हे ओबीसीला मतदान करणार नसल्याचे सांगतात. तर ओबीसी मराठा उमेदवारांना मतदान करणार नाहीत. जरांगे पाटील हे उमेदवार उभे करणार असल्यामुळे राष्ट्रीय पक्षांना फटका नक्कीच बसेल, असे ते म्हणाले.

    आम्ही ‘बहुजन मेड इन इंडिया’साठी आग्रही

    प्रकाश आंबेडकर यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत आपले मत व्यक्त केले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात जागा देऊ नये, याला आमची प्राथमिकता असेल. तसेच सवर्ण समाजकडून ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला जातो; पण आम्ही ‘बहुजन मेड इन इंडिया’बाबत आग्रही आहोत. बहुजनांमध्ये अनेक कौशल्य कारागीर आहेत. भारतात कशा प्रकारे उत्पादन वाढवायचे, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे आम्ही भविष्यात रोजगारनिर्मितीच्या अनुषंगाने पावले टाकू, असे आंबडेकर यांनी सांगितले.

    राहुल गांधी दुटप्पी

    प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधी यांच्या जातीय जनगणनेच्या मागणीवर भाष्य केले. राहुल गांधी हे दुटप्पी आहेत. राहुल गांधी बोलतात एक आणि त्यांचा पक्ष करतो दुसरेच. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला मान्यता दिल्यानंतर तेलंगणा आणि कर्नाटकने त्यासाठी समिती गठित केली. मात्र, दलित संघटनांचे यावर वेगळे मत असल्याचे ते म्हणाले.

    Prakash Ambedkar said – Rahul Gandhi is two-faced, he speaks one thing and his party does another

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस