विशेष प्रतिनिधी
मुंबई : prakash ambedkar ओबीसी लढ्याचे नेतृत्व धनगर समाजाने हाती घ्यावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. आगामी निवडणुकीत ओबीसीने आरक्षणवादी जनतेला सोबत घेऊन निवडणूक लढवावी, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. तसेच सवर्णांना मतदान करण्याऐवजी एससी-एसटी उमेदवारांना आणि ते नसतील तर मुस्लिमांना मतदान करावे, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले. धनगर समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आज पुण्यात पार पडले. या अधिवेशनात प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. या अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.prakash ambedkar
राज्यातील मराठा आरक्षणाच्या वादानंतर आता मराठा आणि ओबीसी समाजातील तणाव पुन्हा उफाळून आला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी सातत्याने केल्याने ओबीसी समाजात नाराजी पसरली असून, त्यांनी या निर्णयाचा तीव्र विरोध सुरू ठेवला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी 15 दिवसांपासून उपोषण करणारे दीपक बोराडे यांनी प्रकृती खालावल्यामुळे 2 ऑक्टोबर रोजी उपोषण मागे घेतले. याच संदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी धनगर समाजाने आता ओबीसींच्या या लढ्याचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.prakash ambedkar
नेमके काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
धनगर समूहाने हे लक्षात घ्यावे की, धनगर हा लढाऊ समाज आहे. धनगर समाजानेच आता ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व घ्यावे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ओबीसींना महाराष्ट्रात सध्या 27 टक्के आरक्षण आहे, पण तेलंगणासारखे राज्य हे प्रमाण 62 टक्क्यांपर्यंत नेऊ शकते, तर महाराष्ट्रातही ते शक्य आहे. त्यासाठी धनगर समाजाने राजकीय नेतृत्व घ्यावे आणि विधानसभेची सत्ता हस्तगत करून आरक्षण वाढवावे, तेव्हाच समाजाला न्याय मिळेल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
ओबीसींनी सवर्णांना मतदान करू नये
आंबेडकर पुढे म्हणाले, ओबीसी समाजाने राज्यसत्तेवर हक्क मिळवला पाहिजे. आता लोकांनी मतदान करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा. जर ओबीसी उमेदवार नसेल, तर एससी आणि एसटी उमेदवारांना मतदान करावे. तेही नसतील तर मुस्लीम उमेदवारांना मतदान करावे. सवर्ण समाजाने दीर्घकाळ अन्याय केला आहे; त्यामुळे ओबीसी लोकांनी या सवर्ण उमेदवारांना मतदान करू नये असे मी त्यांना आवाहन करतो.
कुणबी-मराठ्यांना घुसवून ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव
धनगर आणि धनखड हे वेगळे असल्याचे सांगून आपला अधिकार हिरावला गेला आहे, असे ॲड. आंबेडकर म्हणाले. 1950 ते 1990 पर्यंत जवळपास 40 वर्षे धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित राहावे लागले. मिळालेल्या आरक्षणातही कुणबी-मराठ्यांना घुसवण्याचा प्रयत्न सुरू असून, हा ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले. आपली सगळ्यांची सामाजिक आणि राजकीय ओळख आता ओबीसी म्हणूनच झाली पाहिजे. या सगळ्यांना एकत्रित आणलं पाहिजे. सगळ्या समाजाने एकत्र येऊन त्याची ओळख ओबीसी झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
मला मुख्यमंत्री आणि मंत्री व्हायचे नाही
आम्ही 1980 पासून ओबीसी समाजाचे नेतृत्व करत आलो आहोत आणि त्यात कोणताही बदल केला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आमच्या समाजात प्रामाणिक नेता होत नाही याची खंत आहे,” असे त्यांनी नमूद केले. “मला मुख्यमंत्री आणि मंत्री व्हायचे नाही.” महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना सत्तेत आणण्याचे जे कार्य केले, तेच पुढे घेऊन जाण्याची आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
आरएसएसवर टीका
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएसवर टीका करत सवाल उपस्थित केला. “खंडोबा या देवाला गोळवहकर पासून ते मोहन भागवत यांनी एकदाही भेट दिली आहे का? ते दाखवून द्या, असेही ते म्हणाले.
Prakash Ambedkar Urges Dhangars to Lead OBC Fight, Asks Voters to Support SC-ST/Muslims Over Savarnas
महत्वाच्या बातम्या
- PoK : पीओकेमध्ये 5 दिवसांनंतर हिंसक निदर्शने थांबली, पाकिस्तान सरकारने निदर्शकांच्या 21 मागण्या मान्य केल्या
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडून हिरवी चादर ओढली, त्यांचा रॅडिकल इस्लामिक विचारांना बळ देण्याचा प्रयत्न, अमित साटमांचे आरोप
- भारताचे जागतिक व्यापार करार वाढले, तर उत्पादन क्षेत्रात भारताची मोठी झेप; जागतिक बँकेची ग्वाही
- Nirav Modi : नीरव मोदी म्हणाला- भारतीय तपास संस्था छळतील, प्रत्यार्पण प्रकरण पुन्हा उघडण्यासाठी लंडन न्यायालयात याचिका दाखल केली