विशेष प्रतिनिधी
पुणे : सध्या मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भुरळ घातली आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमात सुत्रसंचालन करताना ती नेहमी आपल्या चाहत्यांना दिसत असते. महाराष्ट्राच्या या लाडक्या अभिनेत्रीने वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पांचं दर्शन घेतलं. Prajakta Mali News
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाने प्राजक्ता माळी आणि इतर कलाकारांची प्रेमाने विचारपूस केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या. यावेळी प्राजक्ताने स्वत:ला भाग्यवान म्हटले आहे.
प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, “सालाबादप्रमाणे यंदाचेही वर्षी “वर्षा बंगल्यावर” जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. मा. मुख्यमंत्री व मा. श्री श्रीकांत दादा शिंदे यांचे; आम्हा कलाकारांना घरी बोलावल्याबद्दल, अत्यंत प्रेमाने पाहूणचार केल्याबद्दल मन:पुर्वक आभार. ! स्वतःला भाग्यवान समजते की दरवर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना समक्ष भेटता येतय, आपल्या समस्या- अडचणी त्यांच्यासमोर मांडता येतायेत.”प्राजक्ता माळी आपल्या भेटीला एक नविन चित्रपट घेऊन आलीये. ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट लवकरच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानिमीत्त आयोजित केलेल्या प्रीमिअरमध्ये तिने माध्यमांशी संवाद साधला आणि चाहत्यांची भेट देखील घेतली.
Prajakta Mali News
महत्वाच्या बातम्या
- कावेरी पाणी वाटपाचा मुद्दा तापला, आज शेतकऱ्यांची कर्नाटक बंदची हाक; 30 हून अधिक शेतकरी गट, व्यापारी संघटनांचा पाठिंबा
- Asian Games 2023: भारताला नेमबाजीत आणखी एक सुवर्ण, पुरुष संघाने केला विश्वविक्रम
- इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 : भारतीय लोकसंख्येची झपाट्याने वृद्धत्वाकडे वाटचाल, शतकाअखेरीस 36 टक्के राहील प्रमाण
- राहुल गांधींची फर्निचर मार्केटला भेट; लाकूड कापून खुर्ची बनवायला शिकले; मजुरांच्या समस्या घेतल्या जाणून