वृत्तसंस्था
मुंबई : पॉर्नोग्राफी फिल्म मेकिंग प्रकरणातील आरोपी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थॉर्प या दोघांचाही याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. Porn film making case; Petition of Raj Kundra, Ryan Thorpe by Mumbai High Court; Rejected; I have to stay in the cell
या दोघांनी मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशांना मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. आम्हाला पोलीस कोठडीत ठेवून चौकशी करण्याचे आदेश देण्याचे अधिकार मॅजिस्ट्रेट कोर्टाला नाहीत, असा दावा राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांनी वकिलांकडून हायकोर्टात केला होता. परंतु हा दावा हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. मॅजिस्ट्रेट कोर्टाचे अधिकार आणि कार्यकक्षा काय आहेत हे हायकोर्टाला पूर्ण माहिती आहे. ते तुमच्याकडून ऐकण्याची हायकोर्टाची इच्छा नाही, असे कोर्टाने राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांना सुनावले आहे.
मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर या दोघांनाही पॉर्न फिल्म मेकिंग केस संदर्भात पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडीतच राहावे लागणार आहे.
दरम्यान, अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिची मुंबई पोलिसांनी चौकशी केली असून तिने राज कुंद्रावर आरोप लावले आहेत. फिल्ममध्ये काम देण्यासाठी मला राज कुंद्रा बरोबर “संबंध” ठेवण्यास सांगण्यात आले होते, असा आरोप तिने केला आहे. हा जबाब तिने पोलिसांना दिला आहे. आता यावर राज कुंद्रा याची कोठडीत चौकशी करण्यात येईल. याखेरीज अन्य काही मुली पोलिसांपर्यंत पोहोचल्या असून त्यांनीही आपापले जबाब पोलिसांमध्ये नोंदविले आहेत. या जबाबांची दखल घेऊनही राज कुंद्रा याची चौकशी करण्यात येईल.