• Download App
    Pooja Chavhan suicide : ...ते ९० मिनिटं - पुजा चव्हाण आत्महत्या : पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा ; होय ..ते शिवसेनेचे संजय राठोडचं ?। Pooja Chavhan suicide: ... 90 minutes - Pooja Chavan suicide: important evidence in the hands of the police; Yes..that is Sanjay Rathore of Shiv Sena?

    Pooja Chavhan suicide : …ते ९० मिनिटं – पुजा चव्हाण आत्महत्या : पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा ; होय ..ते शिवसेनेचे संजय राठोडचं ?

    पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत.


    पोलिसांना २२ वर्षीय पूजाच्या मोबाईलमधून अनेक कॉल रिकॉर्डिंग आढळून आले आहेत.


    पूजा चव्हाणशी फोनवर बोलणारा व्यक्ती संजय राठोड असल्याचं समजत आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तपास करणाऱ्या पुणे पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे. आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. या सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे.Pooja Chavhan suicide: … 90 minutes – Pooja Chavan suicide: important evidence in the hands of the police; Yes..that is Sanjay Rathore of Shiv Sena?

    इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पूजाच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या या संभाषणांमधील एक संभाषण ९० मिनिटं चाललं होतं. पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारीला पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी मारली होती. त्यात तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव सातत्याने घेतले जात होते. राठोड यांनी २८ फेब्रुवारीला राजीनामा दिला होता. त्यानंतर पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत.



    ‘पूजा चव्हाणशी फोनवर बोलणारा व्यक्ती संजय राठोड असल्याचं समजत आहे. पूजाने सर्व कॉलचे रिकॉर्डिंग केली आहे. संभाषण बंजारा भाषेमध्ये झाले होते. पोलीस या संभाषणाचे ट्रान्सलेशन करुन घेत आहेत. संजय राठोड ज्या बंजारा समाजातून येतात, त्याच समाजातून पूजा चव्हाण येते’, पोलिसातील सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातील माहिती दिली.

    पूजा बीडची असून ती पुण्यामध्ये एक कोर्स करत होती. तिचे आणि आमदार राठोड यांचे प्रेमसंबंध होते असा आरोप आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कॉल रिकॉर्डिंग असलेला पूजा चव्हाणचा फोन पुण्यातील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये Science Laboratory (FSL) पाठवण्यात आला आहे.

    यवतमाळ-

    • मेडिकल कॉलेज परिसरातील सीसीटीव्ही फूटेजही लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
    • सूत्रांच्या माहितीनुसार, फूटेजमध्ये पूजा आणि संजय राठोड यांचा जवळचा साथीदार अरुण राठोड आहे.
    • यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये पूजा अरुण राठोड नावाच्या एका मुलीचा गर्भपात झाला होता. ही महिला पूजा चव्हाणच होती का ? हे लवकरच स्पष्ट होईल.

    Pooja Chavhan suicide : … 90 minutes – Pooja Chavan suicide: important evidence in the hands of the police; Yes..that is Sanjay Rathore of Shiv Sena?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!