रेमडेसीवीर इंजेक्शनचे राजकारण करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाणाऱ्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रा ला पन्नास हजार इंजेक्शन पुरविण्याची तयारी दाखविणाऱ्या कंपनीच्या मालकालाच अटक केली. भारतीय जनता पक्षातर्फे केलेली ५० हजार इंजेक्शनची मागणी पूर्ण करण्याची तयारी दर्शविणे हाच त्यांचा अपराध झाला.Politics of Remedesivir injection, owner of company arrested for providing 50,000 injections to Maharashtra arrested
विशेष प्रतिनिधी
मुंबई : रेमडेसीवीर इंजेक्शनचे राजकारण करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाणाऱ्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रा ला पन्नास हजार इंजेक्शन पुरविण्याची तयारी दाखविणाऱ्या कंपनीच्या मालकालाच अटक केली.
भारतीय जनता पक्षातर्फे केलेली ५० हजार इंजेक्शनची मागणी पूर्ण करण्याची तयारी दर्शविणे हाच त्यांचा अपराध झाला.भारतीय जनता पक्ष पाच कोटी रुपये खर्च करून पन्नास हजार रेमडेसिवीर विकत घेणार होता.
विशेष म्हणजे ही इंजेक्शन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेट देणार होता. मात्र, त्यामुळे उध्दव ठाकरे यांचा इगो दुखावला गेला.शनिवारी रात्री उशिरा बुक फार्मा कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलीसांनी अटक केली.
याची माहिती कळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर तातडीने पोलीस ठाण्यात पोहोचले. डोकानिया यांच्यावर आकसाने कारवाई केल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे ब्रुक फार्मा कंपनीत दमनला गेले होते.
महाराष्ट्राला रेमडेसीवीर द्या अशी विनंती केली होती. यावर कंपनीने सांगितलेले की, आम्हाला परवानगी दिली तर आम्ही आमच्याकडील साठा महाराष्ट्राला देण्यास तयार आहोत. यानुसार केंद्राला आम्ही विनंती केली की परवानगी द्यावी लागेल.
यावर त्यांच्याशी टायअप करून देतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या लायसनवर परवानगी मिळेल, असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले होते, असे फडणवीस म्हणाले. त्या कंपनीने जे रेमडेसीवीर इंजेक्शन बनविवले होते
त्याला दमनच्या एफडीए आणि राज्याच्या एफडीएची परवानगी हवी होती. ती दिली गेली. दुपारच्यावेळी मंत्र्यांचे ओएसडी यांनी मालकाला फोन करून धमकी दिली.
रात्री ९ वाजता आम्हाला मेसेज आला की १० पोलीस त्यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून आणले.
हे कसले राजकारण सुरु आहे, असा सवाल करून फडणवीस म्हणाले, आम्हाला यात राजकारण करायचे नाही. परंतू जे काही सुरु आहे ते दिसतेय. डीसीपी आता सांगत आहेत की, टीप मिळाली होती, की ६०००० इंजेक्शन त्यांच्याकडे आहेत. यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेतले.
आम्ही त्यांना अटक करणार नव्हतो. चौकशीला बोलावले होते. राज्याला रेमडेसीवीर पाठविण्याची वेळ असताना त्या कंपनीच्या मालकाला इथे आणून बसविण्यात आले. हे कसले राजकारण आहे?
जर ते सर्व परवानगी घेऊन राज्याला रेमडेसीवीर देत असतील आणि जर त्यांना अशी वागणूक दिली जात असेल तर हे चुकीचे आहे, सहन केले जाणार नाही. आता त्या व्यक्तीला पोलिसांनी सोडले आहे. आपण पोलिसांवर विश्वास ठेवू.
Politics of Remedesivir injection, owner of company arrested for providing 50,000 injections to Maharashtra arrested