• Download App
    लसीवरून राजकारण दिले उत्तर, महाराष्ट्रात पाच लाख डोस शिल्लकPolitics from Vaccine, Center announces data, Maharashtra has five lakh doses left

    लसीवरून राजकारण, केंद्राने डाटाच जाहीर करून दिले उत्तर, महाराष्ट्रात पाच लाख डोस शिल्लक

    महाराष्ट्रासह विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या सगळ्याच राज्यांमध्ये लसीवरून राजकारण केले जात आहे. केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी लसीचा तुटवडा असल्याचे भासविले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसींचा डाटाच जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रात पाच लाख लसींचे डोस शिल्लक असून पुढील तीन दिवसांत आणखी पाच लाख डोस केंद्राकडून मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. Politics from Vaccine, Center announces data, Maharashtra has five lakh doses left


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महाराष्ट्रासह विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या सगळ्याच राज्यांमध्ये लसीवरून राजकारण केले जात आहे. केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी लसीचा तुटवडा असल्याचे भासविले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसींचा डाटाच जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रात पाच लाख लसींचे डोस शिल्लक असून पुढील तीन दिवसांत आणखी पाच लाख डोस केंद्राकडून मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    देशात १ मे पासून १८ वर्षावरील सगळ्यांना लस दिली जाणार आहे. मात्र लसीची तुटवडा कमी असल्याने अनेक राज्यात लसीकरण होणार नसल्याचं सांगितले जातं आहे. महाराष्ट्रातही १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांचं लसीकरण होणार नाही असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते. महाराष्ट्रात लसींचा साठी अपुरा असल्याने लसीकरण मोहिमेवर परिणाम होत असल्याचे चित्र निर्माण करून केंद्र सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे. यावर केंद्रीय मंत्रालयाने भाष्य केले आहे. महाराष्ट्रात २८ एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत १ कोटी ५८ लाख ६२ हजार ४७० लसीचे डोस उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील ०.२२ टक्के खराब झालेल्या डोससह १ कोटी ५३ लाख ५६ हजार १५१ लसीचे डोस दिले गेले आहेत. आताही राज्याकडे ५ लाखाहून अधिक डोस शिल्लक आहेत. पुढील ३ दिवसांत महाराष्ट्राला ५ लाख लसीचे डोस उपलब्ध केले जातील.

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोविड १९ चा १ कोटींहून अधिक लस उपलब्ध असल्याचे सांगितले. त्याचसोबत पुढील ३ दिवसात राज्यांना ५७ लाख ७० हजार लसीचे डोस उपलब्ध केले जातील. केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये १५ कोटी ९५ लाख ९६ हजार १४० लस मोफत उपलब्ध करून दिल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रालयाने याबाबतचा डेटा जारी केला आहे. त्यात सध्या राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडे १ कोटींहून अधिक लसीचे डोस उपलब्ध आहेत.

    मंगळवारी ४ बिगर भाजपा शासित राज्यांनी १ मेपासून लसीकरण करण्यासाठी तयार नसल्याचं सांगितलं होतं. लसींचा अभाव असल्याने लसीकरण कसं करायचा असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्रालयाने हा डेटा जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे. दिल्लीला ३६ लाख ९० हजार लसीचे डोस दिले आहेत. त्यातील ३२ लाख ४३ हजार ३०० लसीच डोस संपलेत. आताही राज्याकडे ४ लाख ४७ हजार ४१० लसीचे डोस शिल्लक आहेत. यापुढे दिड लाख लसीचे डोस उपलब्ध केले जातील.राजस्थानात आतापर्यंत १ कोटी ३६ लाख १२ हजार ३६० लस उपलब्ध केल्यात.

    आता त्यांच्याकडे ३ लाख ९२ हजार लसीचे डोस उपलब्ध आहेत. त्यांना २ लाख लसीचे डोस उपलब्ध करून देणार आहोत. पश्चिम बंगालमध्ये १ कोटी ९ लाख ८३ हजार ३४० डोस दिलेत. त्यातील २ लाख ९२ हजार ८०८ डोस शिल्लक आहेत. तर ४ लाख आणखी डोस उपलब्ध करणार आहोत. छत्तीसगडमध्ये ५९ लाख १६ हजार ५५० लसीचे डोस दिलेत. त्यातील ३ लाख ३८ हजार ९६३ डोस शिल्लक आहेत. त्यांनाही २ लाख लसीचे डोस लवकरच दिले जातील असं केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

    Politics from Vaccine, Center announces data, Maharashtra has five lakh doses left


    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले