• Download App
    Raj Thackeray राज्यकर्त्यांचे मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य; उद्या मराठी पुरस्कार घेताना 'भैय्या' दिसतील, पुण्यात राज ठाकरेंचे टीकास्त्र

    Raj Thackeray : राज्यकर्त्यांचे मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य; उद्या मराठी पुरस्कार घेताना ‘भैय्या’ दिसतील, पुण्यात राज ठाकरेंचे टीकास्त्र

    Raj Thackeray

    विशेष प्रतिनिधी

    पुणे: Raj Thackeray पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते वरुण राज भिडे स्मृती पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, पत्रकारांनी एकत्र राहावे ही काळाची गरज, तुम्ही एकत्र राहू नये हे सत्ताधाऱ्यांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरही भाष्य केले आहे.Raj Thackeray

    राज ठाकरे म्हणाले, राज ठाकरे मराठी भाषेबद्दल बोलतो ते लोकांसाठी बोलतो, पश्चातापाचा हाथ मारून काही फायदा नाही. सध्या भैय्यांना मराठी शिकवायचं चाललं आहे. भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील. महाराष्ट्रात राज्यकर्ते शाळा विकत चालले असतील तर तो शाळांचं जागेचा विषय आहे. मराठी माध्यमांचा शाळा ज्या जागेवर आहे तिथल्या जागांवर लक्ष आहे. आयपीएल मध्ये गुंतवून ठेवायचं, कुठेतरी कॉन्सर्ट मध्ये गुंतवून ठेवायचं पण सरकारला प्रश्न विचारू नका हे सध्या चित्र सुरू असल्याचे ठाकरे म्हणाले.Raj Thackeray



    पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, पत्रकारितेतून मी आलो आहे. अनेक ठिकाणी मी काम केलं आहे. घरातच माझ्या ती गोष्ट होती. पत्रकारिता बदलली आहे, यात काही संशय नाही. तुम्ही किती गोष्टी दाखवा, किती लिहा पण सरकारला काही त्याचा फरक पडत नाही ही गोष्ट महत्त्वाची आहे असे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. अनेक चांगले पत्रकार मंत्र्यांकडे काम करत आहेत. तुम्ही लिहित राहाल, बोलत राहाल पण त्याने सत्ता जाते सत्ता येते हा समज असेल तर सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्याची गरज असल्याचे राज ठाकरे म्हणाले. आत्ताची परिस्थिती दिसेल त्याची जमीन असा विषय सुरु आहे.

    आज पुण्याची अवस्था बघा. मूळ पुणे वेगळं, काही आकार उकार नाही. पुण्यात पाणी तुंबणार कारण कोणाचे लक्षच नाही. मुंबईत हजारो एकर जागा गोदरेजची आहे. सरकारी जमिनीवर अनधिकृत कामं कशी झाली? कुठल्याच नगरसेवकाला, आमदाराला आपलेपणाची भावना राहिली नाही. हावरटपणा आणि बजबजपुरी सुरु आहे. अदानी विषय मांडून पुढे काय झालं? पत्रकारांनी तो विषय का नाही धरुन लावला? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

    पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, सर्व पत्रकारांना सांगणे आहे की दबाव आला तर त्यांच्या बातम्या टाकने बंद करा. जिथे जमीन भुसभुशीत असतात तिथेच घुशी होतात, खडकात घुशी होत नाहीत असेही राज ठआकरे म्हणाले. संयुक्त महाराष्ट्र झाला तो म्हणजे 1 मे पण महाराष्ट्र दिन दिवशी मुंबईतल्या मराठी लोकांना बाहेर येऊन वंदन करण्याची जाणीव नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

    Politicians target Marathi school sites; ‘Bhaiyya’ will be seen receiving Marathi awards tomorrow, Raj Thackeray’s criticism in Pune

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण:आरोपी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

    Raosaheb Danve : मविआकडून अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार; आदित्य ठाकरेंची घोषणा; शरद पवार गटाचा पाठिंबा, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

    Vijay Vadettiwar : ठाकरे गटाने काँग्रेसशी चर्चा न करता दानवेंना उमेदवारी दिली; विजय वडेट्टीवार यांचा आरोप