• Download App
    बारामती सोडून पंढरपूर – मंगळवेढ्यातही रंगतेय अजितदादा – पडळकरांची राजकीय जुगलबंदी|political tussle between ajit pawar and gopichand padalkar irrupts in pandharpur

    बारामती सोडून पंढरपूर – मंगळवेढ्यातही रंगतेय अजितदादा – पडळकरांची राजकीय जुगलबंदी

    प्रतिनिधी

    पंढरपूर :  ठाकरे – पवार सरकारते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आता बारामती सोडून पंढरपूर मतदारसंघात राजकीय जुगलबंदी रंगतीय.political tussle between ajit pawar and gopichand padalkar irrupts in pandharpur

    अजितदादांनी परवाच गोपीचंद पडळकरांच्या बारामतीतल्या डिपॉझिट जप्तीचा विषय काढून त्यांना डिवचले. त्याची काल पडळकरांनी परतफेड केली. मी निदान आटपाडीच्या गरीब घरातून बारामतीत येऊन उभारण्याची हिंमत दाखविली.



    पण तुमचा मुलगा अडीच लाखांनी मावळात पडला, अशी टीका पडळकरांनी केली. अजित पवारांचे बोलणे टग्यासारखे आणि रडणं बाईसारखे आहे, अशा शब्दांत गोपीचंद पडळकरांनी मंगळवेढ्याच्या सभेत त्यांची खिल्ली उडवली.

    अजित पवार यांनी काल कासेगावच्या सभेत पडळकरांवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, “सध्या एक नेता तुमच्याकडे जोरदार भाषणे करत फिरतोय, त्याचे डिपॉझिट सुद्धा त्याला बारामतीमध्ये वाचवता आले नव्हते

    आणि आता हा कोणाच्या तोंडाने मते मागतोय? ज्याला स्वतःचे डिपॉझिट वाचवता आले नाही तो तुम्हाला सल्ले देतोय,” असे म्हणत अजितदादांनी पडळकरांची खिल्ली उडवली होती.

    त्याला पडळकरांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ईडीची नोटीस आल्यावर अजित पवारांचे रडणे जगाने पाहिले. चुलता हेच त्यांचे भांडवल असल्याचे अजित पवार कबूल करतात. म्हणजेच त्यांचे कर्तव्य शून्य असल्याचे दाखवून देतात, असा टोला पडळकरांनी लगावला.

    पडळकर म्हणाले की, आज उपमुख्यमंत्र्यांना गल्ली बोळात दारोदार फिरण्याची वेळ का आली आहे. मी आटपाडीतून येऊन बारामतीत उभरलो आणि डिपॉझिट गेले पण अजित पवार यांच्या पोराचा अडीच लाखाने पराभव का झाला याचे उत्तर द्यावे? असा सवालही त्यांनी केला.

    political tussle between ajit pawar and gopichand padalkar irrupts in pandharpur

    हे ही वाचा

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा