विशेष प्रतिनिधी
पुणे: पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले आहे. १० मार्चनंतर महाविकासआघाडी सरकारला सत्ता सोडावी लागेल, असा अंदाज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.Political quake in Maharashtra after March 10, Mahavikas Aghadi will have to leave power, predicts Chandrakat Patil
पाटील म्हणाले, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत. सरकारमधील मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल.
महाविकास आघाडी सरकारची सध्याची स्थिती पाहिली तर कोणीही विश्लेषण करणारा सांगू शकेल की, हे सरकार आता फार दिवस टिकणार नाही, असे सांगून पाटील म्हणाले आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील. पोलिसांच्या बदल्यांबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांना अनिल देशमुख यांच्याकडून यादी मिळत होती असे सांगितले.
तर देशमुख म्हणतात की, त्यांना शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याकडून मिळत होती व ते ती पुढे पाठवत होते. दुसरीकडे आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी सांगितले की, सचिन वाझे याला पुन्हा नोकरीत घेण्यासाठी त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव आणला होता.
या गंभीर आरोपांनंतर आघाडीच्या नेत्यांनी काहीही संवेदनशीलता दाखवली नसली तर ही प्रकरणे गुन्ह्याची आहेत. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला तसा या गंभीर प्रकरणांबाबत न्यायालय न्याय देईल. अशी स्थिती निर्माण होईल की, आघाडीच्या नेत्यांना सत्ता सोडून घरी जावे लागेल.
Political quake in Maharashtra after March 10, Mahavikas Aghadi will have to leave power, predicts Chandrakat Patil
महत्त्वाच्या बातम्या
- Vaccination : ५-१५ वर्षांच्या बालकांच्या लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार निर्णय घेणार
- भन्नाट उद्योजक महिंद्रा : कंटाळलेल्या सुरक्षारक्षकाने ७ कोटींच्या चित्रावर बॉल पेनने काढले डोळे-गमावली नौकरी मात्र आनंद महिंद्रा म्हणतात… Why Worry ?
- पश्चिम बंगाल पाठोपाठ गोव्यातही शरद पवारांची प्रचाराला हुलकावणी!!; ते उत्तर प्रदेशात जातील??
- सर्व रेल्वेंमध्ये सुरू होणार केटरिंग सेवा : १४ फेब्रुवारीपासून सर्व ट्रेनमध्ये मिळेल गरम जेवण, प्रवाशांना मिळणार सुविधा