विनायक ढेरे
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सवात बडे नेते विविध मंडळांना भेटी देणे हा नित्याचाच भाग आहे. पण आता महापालिका, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका जवळ येत असताना गणेशोत्सवात एकमेकांच्या घरी जाऊन बडे नेते ज्या भेटी घेत आहेत, त्यातून नव्या राजकीय गाठी बांधणार का??, याची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. Political ganpati darshan in festival of amit shah, eknath shinde, devendra Fadanavis and raj Thackeray
– शिंदे, फडणवीस यांची गणेश दर्शने
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या घरी जाऊनही गणेश दर्शन घेतले आहे. त्याचबरोबर अनेक नेत्यांनी शिंदे फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांच्या गणपती घरी बसवलेल्या गणपतीचे दर्शन घेतले. बरेचसे नेते राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेत आहेत. या सगळ्यांमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थया निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी बोलले. पण या गणेश दर्शनानिमित्त झालेल्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यामुळे नवी समीकरणे जुळवण्याचा प्रश्न नाही, असे उत्तर त्यांनी नंतर पत्रकारांना दिले.
– राज ठाकरेंच्या घरी भाजप नेत्यांचा राबता
गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज ठाकरे यांना यांच्या घरी जाऊन त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले. त्यामुळेच गणेशोत्सवाच्या या भेटींमधून नव्या राजकीय गाठी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एक प्रकारे महाराष्ट्रात हिंदुत्ववादी पक्षांची आणि गटांची मजबूत एकजूट बांधण्याच्या दिशेने या भेटीगाठींची पावले पडताना दिसत आहेत.
– अमित शहांचा दौरा
यातच 5 सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्या राजकीय बैठकांचा सिलसिला सुरू होणार आहे. मुंबई, नागपूर, ठाणे, पुणे, संभाजीनगर कोल्हापूर आदी महापालिका निवडणुकीमध्ये स्वतः अमित शहा हेच तिकीट वाटपात लक्ष घालणार असल्याचे पक्षाच्या भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे अमित शहा हे बऱ्याच वेळा महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये इथून पुढच्या काळात येणार आहेत. त्यानंतर बैठकांचा सिलसिला अधिक वेगवान होईल. पण त्या पण त्याची सुरुवात मात्र 5 सप्टेंबरच्या गणेश दर्शनाने होणार आहे हे येथे अधोरेखित केले पाहिजे.
– पवार घालणार ठाण्यात लक्ष
ठाण्यामध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे शरद पवार ठाण्यात जाऊन नुकतेच म्हणाले होते. याचा अर्थ शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाणे महापालिका निवडणुकीत लक्ष घालणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजप देखील सावध राहून महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने गणेशोत्सवाच्या भेटीगाठींमधून जोरदार तयारीला लागल्याचे दिसत आहे. त्या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दौरे मात्र तितकेसे होताना दिसत नाहीत. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याचा हा परिणाम आहे का??
Political ganpati darshan in festival of amit shah, eknath shinde, devendra Fadanavis and raj Thackeray
महत्वाच्या बातम्या
- LPG Cylinder Price : LPG सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या काय आहेत दिल्ली ते मुंबईचे नवे दर?
- Rule Change From 1st September : आजपासून होणार हे 6 मोठे बदल, जाणून घ्या कसा वाढला तुमच्या खिशावरचा भार!
- Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत 117 नेते सहभागी होणार, कन्हैया कुमार आणि पवन खेरा यांचेही नाव यादीत
- अमरावतीत लव्ह जिहाद; धर्मांध मुसलमानाने फसवले उच्चविद्याविभूषित हिंदू तरुणीला!!