विशेष प्रतिनिधी
पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल लोणावळ्यात महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांवर केलेली फटकेबाजी या पक्षाच्या नेत्यांना चांगलीच झोंबली आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना उद्देशून नानांनी पाठीत खंजीर खुपसलेला सहन करणार नाही, असे उद्गार काढले होते.political back stabing; nana patole is small guy, i won`t react to his statemaents, says sharad pawar
य़ा उद्गारांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतून प्रत्युत्तर दिले आहे. हे सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी काही बोललो असतो. पण लहान माणसांवर मी बोलत नसतो, असा टोला त्यांनी बारामतीत आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नानांना लगावला.
बाकी नाना पटोलेंच्या स्वबळाच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवारांनी प्रत्येक पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा आणि मजबूत करण्याचा अधिकार आहेच. काँग्रेस स्वबळावर लढणार असेल, तर स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
नाना पटोले यांनी लोणावळ्यात काँग्रेसच्या शिबिरात बोलताना अजित पवारांना उद्देशून खंजीर खुपसण्याचा उल्लेख केला होता. हा अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला.
त्यावर शरद पवार यांनी थेट प्रतिक्रिया देताना टाळले परंतु, त्यांच्यासारख्या लहान माणसावर बोलणार नाही असे म्हटले. ते म्हणाले की, या गोष्टीत मी पडत नाही. ती लहान माणसे आहेत, त्यांच्यावर मी कशाला बोलू? जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो.
political back stabing; nana patole is small guy, i won`t react to his statemaents, says sharad pawar
महत्त्वाच्या बातम्या
- ATS ने अलकायदाचा कट हाणून पाडला, लखनऊसह अनेक जिल्ह्यांत साखळी स्फोट घडवण्यापूर्वी 2 दहशतवाद्यांना अटक, जिवंत प्रेशर कुकर बॉम्बही जप्त
- धक्कादायक : बंगाली अभिनेत्रीला बलात्काराच्या धमक्या, कोलकाता पोलिसांकडून गुन्हा दाखल
- पुण्यात राज ठाकरेंची पत्रकार परिषद; एकनाथ खडसेंची सीडी, मराठा- ओबीसी आरक्षण अन् महापालिका निवडणुकांवर भाष्य
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी लोकसंख्या धोरण 2021-30 ची केली घोषणा, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे!
- राज्यात एकतर कडक लॉकडाउन लावा, नाहीतर पूर्णपणे सूट द्या; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मुख्यमंत्री ठाकरेंना विनंती