• Download App
    पुण्यात गुंडाकडून पोलिसाची हत्या ; कायदा व सुव्यवस्थेच्या चिंध्या । Policeman killed in Pune

    पुण्यात गुंडाकडून पोलिसाची हत्या ; कायदा व सुव्यवस्थेच्या चिंध्या

    वृत्तसंस्था

    पुणे : पुण्यात एका गुंडाने पोलिस हवालदाराची हत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. चाकूने वार करून ही हत्या झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या चिंध्या उडालेल्या आहेत. Policeman killed in Pune

    शहराच्या मध्यवर्ती असलेल्या बुधवार पेठेतील फरासखाना पोलिस ठाण्याच्या हवालदाराची हत्या झाली. प्रविण श्रीनिवास महाजन (३४) असं आरोपी गुंडाचं नाव आहे. त्याला अटक केली आहे.



    फरासखाना पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या फोनवरून माहिती मिळाली होती. बुधवार केजळे चौकाजवळील ढमढेरे बोळात जाणार्‍या रोडवर हॉटेलसमोर एका व्यक्तीवर चाकूने वार झाल्याचं सांगितले. आम्ही काही मिनिटात घटनास्थळी पोचलो. यावेळी तिथे हवालदार समीर सय्यद रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. चौकशीत पव्या महाजनने हल्ला केल्याचे सांगण्यात आले”.

    “ एक रुग्णवाहिका थांबवून समीर सय्यद यांना रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी आरोपी प्रवीण महाजनविरोधात गुन्हा दाखल झाला आहे,” अशी माहिती श्रीकांत सावंत यांनी दिली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

    Policeman killed in Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस