विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महायुतीवर मात केल्यानंतर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट आव्हान दिले होते. मोदींनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात. त्याचा आम्हाला फायदाच होईल, असे ते म्हणाले होते. त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीचा हवाला दिला होता. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी 17 लोकसभा मतदारसंघात सभा घेतल्या होत्या, पण त्यापैकी 11 उमेदवार पडले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील तसेच घडेल, असा दावा शरद पवारांनी केला होता.
मात्र शरद पवारांचे हे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने स्वीकारले असून मोदी 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर अशी सलग 8 दिवस महाराष्ट्रात प्रचाराचा धडाका लावणार आहेत. भाजपने हरियाणात अशक्यप्राय विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रात तसा विजय रिपीट करण्यासाठी मोदी येणार आहेत. यादृष्टीने पवारांनी मोदींना दिलेले आव्हान ही फारच किरकोळ बाब आहे. कारण शरद पवार ज्यावेळी फक्त स्वतःच्या राष्ट्रवादीच्या मतदारसंघात लक्ष केंद्रित करून प्रचारात मग्न असतील, त्यावेळी मोदी मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर झंझावाती प्रचार करत फिरत राहणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या सर्व विभागात आणि महायुतीच्या सर्व पक्षांसाठी जाहीर प्रचार सभा होणार आहेत.
मोदींच्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्याही सभांचा धडाका भाजपा लावणार आहे. स्वतः अमित शाह यांनी महाराष्ट्रात लक्ष घालून बंडखोरी रोखणे, त्याचबरोबर सूक्ष्म पातळीवर बूथ नियोजन करणे, मतदानाचा टक्का वाढविणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. “बटेंगे तो कटेंगे” ही घोषणा सर्वव्यापी करायचे भाजपने आधीपासूनच नियोजन चालविले आहे.
PM Modi will be in maharashtra elections for 8 days
महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Board महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय!, आता विद्यार्थ्यांना नापास होण्याची चिंता नाही
- Priyanka Gandhi 8 लाखांची कार, 1.15 कोटींचे सोने; जाणून घ्या, प्रियंका गांधींची एकूण संपत्ती किती?
- MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी उमेदवारी यादी जाहीर
- CRPF schools : देशातील अनेक CRPF शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी