आदिवासी समजातील भगिनीला राष्ट्रपती पदासारख्या देशातील सर्वोच्च स्थानी विराजमान करण्याचे काम मोदींनी केले.
विशेष प्रतिनिधी
नंदुरबार : लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ.हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट जनसभा आयोजित करण्यात आली होती. या जनसभेला उपस्थित राहून आदिवासी बांधवांचे सर्वांगीण हित साधायचे असेल तर महायुतीच्या उमेदवार डॉ.हिना गावित यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.PM Modi has never looked at tribal community as just a vote bank Eknath Shinde
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, महायुतीच्या उमेदवार डॉ.हिना गावित, मंत्री अनिल पाटील, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच महायुतीच्या घटक पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नंदुरबार येथील लाखो आदिवासी बांधव भगिनी आवर्जून उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी कधीही आदिवासी समाजाकडे फक्त व्होट बँक म्हणून पाहिले नाही. ‘सब का साथ सब का विकास’ हे धोरण घेऊन चालताना त्यांनी राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान आवास योजनेतून आदिवासी बांधवांना घरे मिळाली, महिला भगिनींना घरोघरी शौचालय उभारण्यात आली, उज्ज्वला योजनेद्वारे घरोघरी गॅस मिळाला, जन धन योजनेद्वारे त्यांची बँक अकाउंट उघडली गेली. आदिवासी समजातील भगिनीला राष्ट्रपती पदासारख्या देशातील सर्वोच्च स्थानी विराजमान करण्याचे काम देखील त्यांनी केले.
याशिवाय राज्य शासनाच्या माध्यमातून देखील आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी फेलोशिप दिल्या, दीड लाख विद्यार्थ्यांना दहावीनंतर स्कॉलरशिप, २ लाखांपेक्षा जास्त वनहक्क दावे मान्य केले. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मोदींनी केले आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी डॉ.हिना गावित यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
PM Modi has never looked at tribal community as just a vote bank Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- सुप्रीम कोर्टात केजरीवाल यांच्या जामिनाला ईडीचा विरोध; प्रचार हा मूलभूत अधिकार नाही
- PM मोदी-राहुल गांधींना जाहीर चर्चेचे आव्हान; 2 माजी न्यायमूर्ती आणि एका पत्रकाराने लिहिले पत्र
- महायुतीला पवारांनी महाराष्ट्रात 12 ते 13 जागा “दिल्या”; किती उदार अंत:करण साहेबांचे, म्हणत फडणवीसांनी उडवली खिल्ली!!
- सौरऊर्जा उत्पादनात भारत पोहचला तिसऱ्या स्थानावर, जपानला टाकलं मागे!