अवघ्या दोन दिवसांपूर्वीत घडली होती विमान दुर्घटना
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात विमान दुर्घटना सुरूच असल्याचे दिसत आहे. कारण, अवघ्या दोन दिवसांपूर्वी बारामतीमध्ये विमान कोसळल्याची दुर्घटना घडलेली असताना, आज सकाळी पुन्हा एका शिकाऊ विमानाची दुर्घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वैमानिक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. Plane crash in Pune another training plane crashes Pilot injured
तांत्रिक बिघाड झाल्याने रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटरचं VT-RBT विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत पायलट ट्रेनर आणि एक ट्रेनी पायलट असे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विमान कोसळण्याच्या घटना घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपायोजना कराव्यात अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे.
Plane crash in Pune another training plane crashes Pilot injured
महत्वाच्या बातम्या
- महुआ मोईत्रा वादापासून TMCने राखले अंतर; म्हटले- जो वादात अडकला, त्यानेच बोलावे; निशिकांत दुबे यांची लोकपालकडे तक्रार
- भारताचा मोस्ट वॉन्टेड लष्कर-ए-जब्बारचा संस्थापक दाऊद मलिक पाकिस्तानात ठार
- खासदार महुआ मोईत्रांच्या लाचखोरीतून प्रश्न घोटाळ्यातून तृणमूळ काँग्रेसने झटकले हात!!
- महुआ मोईत्राच्या अडचणी वाढण्याची चिन्हं! लोकसभा अध्यक्षांनंतर आता निशिकांत दुबे यांनी केली लोकपालकडे तक्रार