• Download App
    Pimpri-Chinchwad and Pune; Fadnavis government approves special teams for both places पिंपरी-चिंचवड आणि पुण्यासाठी जलसंधारणाच्या दिशेने मोठे पाऊल; दोन्ही ठिकाणच्या विशेष पथकाला फडणवीस सरकारची मंजुरी

    पिंपरी-चिंचवड आणि पुण्यासाठी जलसंधारणाच्या दिशेने मोठे पाऊल; दोन्ही ठिकाणच्या विशेष पथकाला फडणवीस सरकारची मंजुरी

    Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : वाढती पूरस्थिती, रस्त्यांवर साचणारे पाणी आणि उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई अशा परस्पर विरोधी गोष्टींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र विशेष पथकाला मंजुरी देण्यात आली आहे.Pimpri-Chinchwad and Pune; Fadnavis government approves special teams for both places

    मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नव्या पथकाद्वारे भूगर्भजल पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि जलसंधारण प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख केली जाणार आहे. संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्याचा यशस्वी मुकाबला करण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.



    – जलशक्ती अभियानाला गती

    ‘कॅच द रेन’, ‘जलशक्ती अभियान’ आणि ‘जलसंवर्धन जनभागीदारी’ यांसारख्या केंद्र शासनाच्या उपक्रमांना आता अधिक गती मिळणार असून, शहरांच्या दीर्घकालीन जलव्यवस्थापनासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

    Pimpri-Chinchwad and Pune; Fadnavis government approves special teams for both places

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सत्तेच्या तुकड्यासाठी भांडणे; शिंदे सेनेचे मराठवाड्यात पक्षप्रवेश सोहळे!!

    AI च्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी सध्या सर्वोत्तम काळ आणि संधी; AI क्षेत्रात नेतृत्वासाठी महाराष्ट्र सज्ज!!- मुंबई टेक वीक २०२६ चे उद्घाटन

    विधान परिषदेवर एकही आमदार निवडून आणू न शकणाऱ्या महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर; काँग्रेस ८, राष्ट्रवादी (शप) ३, ठाकरे सेना ४!!