दशांत परदेशी असं मृत मुलाचे नाव आहे. दशांत 17 वर्षांचा होता.एका बंद पडलेल्या कंपनीसमोर तो मृतावस्थेत होता. Pimpri Chinchwad: 11th boy was shot dead in Talegaon
विशेष प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे.याआधी देखील म्हणजेच गेल्या शनिवारी पिंपळेगुरव परिसरात भरदिवसा गोळीबार झाला होता. तेव्हा योगेश जगताप नावाच्या गुन्हेगाराची हत्या झाली. दरम्यान आज तळेगावमध्ये अकरावीत शिकणाऱ्या मुलावर गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.दशांत परदेशी असं मृत मुलाचे नाव आहे. दशांत 17 वर्षांचा होता.
नेमकी घटना काय घडली
दशांत परदेशी काल सायंकाळी 6 वाजता घराबाहेर पडला. परंतु रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही.घरच्यांनी बराच वेळ दशांतची वाट पाहिली.परंतु घरी लवकर न परतल्याने कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली.दरम्यान पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. शोधकार्य सुरू असताना दशांतचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्याला गोळी लागलेली होती.
एका बंद पडलेल्या कंपनीसमोर तो मृतावस्थेत होता. दरम्यान अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी दरम्यान त्याचा कोणाशी काही वाद नव्हता असं कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलेलं आहे. मग ही हत्या कोणी आणि का केली? हा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिलाआहे.