काल (दि. 16) शरद पवार व भाजपच्या महापौर माई ढोरे यांची भोसरी येथील महापालकेच्या रुग्णालयातील आयसीयू उद्घाटानप्रसंगी भेट झाली. Pimpri: BJP mayor greets Sharad Pawar by touching his feet; The eyebrows of the people were raised
विशेष प्रतिनिधी
पिंपरी : राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार पिंपरी चिंचवडच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. काल (दि. 16) शरद पवार व भाजपच्या महापौर माई ढोरे यांची भोसरी येथील महापालकेच्या रुग्णालयातील आयसीयू उद्घाटानप्रसंगी भेट झाली.
यावेळी माई ढोरे यांनी पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच खाली वाकून चरणस्पर्श केल्याने पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपच्या विद्यमान महापौरांनी शरद पवार यांचा आशीर्वाद घेतल्याने त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
मात्र या चर्चांना उधाण येताच महापौर माई ढोरे यांनी सांगितले की, मी भारतीय जनता पार्टीची महापौर आहे. शरद पवार हे सर्वच गोष्टींनी श्रेष्ठ आहेत. त्यांच्या वयाचा मान-सन्मान ठेवेणे आवश्यक आहे. भोसरी येथील रुग्णालयात त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महापौर या नात्याने मी तिथे उपस्थित होते. त्यांचे स्वागत मी केले. त्यांच्या वयाचा मान म्हणून मी दर्शन घेतले. यामध्ये वेगळ्या गोष्टींची चर्चा होण्याचे काही काम नाही. थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेणे आपली संस्कृती आहे. अस स्पष्टीकरण देत त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
Pimpri: BJP mayor greets Sharad Pawar by touching his feet; The eyebrows of the people were raised
महत्त्वाच्या बातम्या
- चीनच्या अवकाशवीरांचा स्पेसवॉकचा विचार; अवकाश स्थानकामध्ये सहा महिने वास्तव्य
- केरळमध्ये पूरसदृश परिस्थिती, १८ जणांचा बळी; लष्कराकडे मदतीसाठी याचना; भूस्खलनात २२ जण बेपत्ता
- Sooryavanshi Movie : ये दिवाली अक्षय वाली ! अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ दिवाळीत करणार धमाका ; 5 नोव्हेंबरला होणार रिलीज!
- PM Kisan Samman Nidhi Yojana : या दिवशी तुमच्या खात्यात जमा होईल 10 वा हप्ता आत्ताच करा नोंदणी
- साम्यवाद – भांडवलशाही यांच्या पलिकडचे एकात्म अर्थचिंतन; दत्तोपंत ठेंगडींचे कार्य जगभर पोहोचविण्याची गरज : दत्तात्रेय होसबाळे