• Download App
    एनएसई कर्मचाऱ्यांच्या फोन टॅपिंगचे प्रकरण : मुंबईचे निवृत्त पोलिस आयुक्तसंजय पांडेंना ईडीकडून अटक|Phone tapping case of NSE employees: Retired Mumbai Police Commissioner Sanjay Pandey arrested by ED

    एनएसई कर्मचाऱ्यांच्या फोन टॅपिंगचे प्रकरण : मुंबईचे निवृत्त पोलिस आयुक्तसंजय पांडेंना ईडीकडून अटक

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबईचे निवृत्त पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने मंगळवारी अटक केली. सेबी नियमांचे उल्लंघन आणि स्टॉक एक्स्चेंजच्या कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदा टॅप केल्याप्रकरणी प्रामुख्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याच प्रकरणात ईडीने चित्रा रामकृष्णन यांना पूर्वी अटक केलेली आहे. विशेष म्हणजे पांडे यांनी मंगळवारीच दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते ईडीसमोर हजर झाले होते.
    पांडेंवर सीबीआयनेही गुन्हा दाखल केला होता. शिवाय त्यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणातही आरोप आहेत.Phone tapping case of NSE employees: Retired Mumbai Police Commissioner Sanjay Pandey arrested by ED

    यापुर्वीही चौकशी

    गत आठवड्यातदेखील ईडीने संजय पांडे यांची चौकशी केली होती. नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणात आधी त्यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत.



    फोन टॅपींगचा आरोप

    संजय पांडे यांनी दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात आज तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. दरम्यान एनएसई घोटाळ्याप्रकरणी संजय पांडे यांच्या कंपनीचा समावेश असल्याचे आरोप त्यांच्यावर होते. त्यांच्यावर फोन टॅपींग केल्याचेही आरोप आहेत. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय कडून चौकशी करण्यात आली. यानंतर ईडीने आज त्यांना अटक झाली.

    पांडे यांच्यावरील आरोप

    संजय पांडे यांच्यावर एनएसई कर्मचाऱ्यांचे कॉल अवैधपणे रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे.
    2009 ते 2017 दरम्यान NSE कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा आरोप
    आयएसईसी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने पांडेंना 4.45 कोटी रुपये दिल्याचे तपासातून पुढे आले.

    Phone tapping case of NSE employees: Retired Mumbai Police Commissioner Sanjay Pandey arrested by ED

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!