विशेष प्रतिनिधी
मुंबई : जगातील कच्च्या तेलाचा तिसरा मोठा ग्राहक भारत सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या् लाटेशी झुंज देत आहे. त्यातच आता पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ होवू लागल्याने सर्वसामान्यांच्या हालात भर पडत आहे. एकूणच पेट्रोल ६ दिवसांत १.४३ रुपये प्रतिलिटर, डिझेल १.६३ रुपयांनी महागले आहे. Petrol prices hiked once again
देशांतर्गत बाजारात सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. ज्यामुळे मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने विक्रमी पातळी गाठली. मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २७ पैसे आणि ३० पैशांनी वाढ झाली आहे.
देशातील बऱ्यातच शहरांमध्ये पेट्रोल प्रतिलिटर १०० रुपयांच्या पलीकडे विकले जात आहे आणि काही शहरांमध्ये ते १०० रुपयांच्या जवळपास पोचले आहे. दिल्लीत पेट्रोल ९१.८० रुपये प्रतिलिटरवर, तर डिझेल ८२.३६ रुपये प्रतिलिटवर गेले आहे. तेच मुंबईत ९८.१२ रुपये प्रतिलिटरवर, तर डिझेल ८९.४८ रुपये प्रतिलिटवर गेले आहे.
मुंबईत पेट्रोलचे दर १०० रुपये प्रतिलिटर आणि डिझेल प्रतिलिटर ९० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोल २४ ते २८ पैशांनी महाग झाले आहे. त्याचप्रमाणे डिझेलदेखील २९ ते ३२ पैशांपर्यंत महाग झाले आहे. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल २७ पैशांनी, तर डिझेल ३० पैशांनी महागले आहे.
Petrol prices hiked once again
महत्त्वाच्या बातम्या