वृत्तसंस्था
मुंबई : अखेर मुंबईतील शिक्षकांना लोकलने प्रवास करण्यास राज्य शिक्षण मंत्रालयाने परवानगी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण मंत्रालयाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठविला असून त्यास मंजुरी मिळाल्याचे वृत्त आहे. permission for teachers to travel by local train, An important decision of the state government
लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी द्या, अन्यथा दहावी,बारावी परीक्षाच्या निकालावर बहिष्कार घालू, असा इशारा मुंबई परिसरातील शिक्षकांनी दिला होता. संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना निकालाचे काम करण्यासाठी जाताना प्रवासाची अडचण होती.
त्यांना मुंबईच्या उपनगरातून प्रवास करण्यासाठी लोकल हे कमी खर्चात असलेले साधन होते. पण, लोकलने प्रवासाची मुभा सरकरने दिली नव्हती.त्यामुळे हजारोंच्या संख्येने असलेल्या शिक्षक वर्गाचा कोंडमारा होत होता.
लोकल प्रवासाची परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला होता. सदर प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.
शिक्षकांना लोकलमध्ये लेवल २ किंवा त्यापेक्षा खालील पास देण्यात येतील. हे पास ऑनलाईन एसएमएस डाउनलोडच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. यासाठीची लिंक देण्यात येईल. यासर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती जमा करण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई हे काम पाहणार आहेत.
permission for teachers to travel by local train, An important decision of the state government
महत्त्वाच्या बातम्या
- जवानांसोबत थिरकला बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमार
- हिंदू आपल्या चुकांमुळे शेकडो वर्षे गुलाम, बंगालमध्ये अजूनही भरतोय जिझिया कर, संबित पात्रा यांचे प्रतिपादन
- राज्यातील प्रत्येक अठरा वर्षांवरील नागरिकाचे लसीकरण नाही तोपर्यंत गोव्यात पर्यटन नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
- नितीन गडकरी यांनी सांगितला पेट्रोल-डिझेल महागाईला इथेनॉल हाच पर्याय,ग्राहकांची होईल २० रुपयांची बचत
- मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याचे दिले आश्वासन, तरीही संभाजीराजे म्हणाले आंदोलन स्थगित करणार नाही
- भाजपाला विरोध करण्यासाठी काँग्रेस, आपच्या नेत्यांनी दिली शंभर कोटी रुपयांची ऑफर, परमहंस दास यांचा दावा