• Download App
    Pegasus Controversy : न्यूयॉर्क टाइम्स हा तर 'सुपारी मीडिया'... पेगाससच्या खुलाशांवर केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांची टीका|Pegasus Controversy The New York Times is a not Reliable media says Union Minister V K Singh

    Pegasus Controversy : न्यूयॉर्क टाइम्स हा तर ‘सुपारी मीडिया’… पेगाससच्या खुलाशांवर केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांची टीका

    पेगासस स्पायवेअरच्या खुलाशांवर केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली. त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला “सुपारी मीडिया” म्हणून संबोधले आणि त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या अमेरिकन वृत्तपत्राने एका बातमीत दावा केला आहे की, भारत आणि इस्रायल यांच्यात 2017 मध्ये अत्याधुनिक शस्त्रे आणि गुप्तचर उपकरणांच्या सुमारे दोन अब्ज डॉलर्सच्या करारामध्ये पेगासस स्पायवेअर आणि क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदी प्रामुख्याने होती.Pegasus Controversy The New York Times is a not Reliable media says Union Minister V K Singh


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पेगासस स्पायवेअरच्या खुलाशांवर केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली. त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला “सुपारी मीडिया” म्हणून संबोधले आणि त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या अमेरिकन वृत्तपत्राने एका बातमीत दावा केला आहे की,

    भारत आणि इस्रायल यांच्यात 2017 मध्ये अत्याधुनिक शस्त्रे आणि गुप्तचर उपकरणांच्या सुमारे दोन अब्ज डॉलर्सच्या करारामध्ये पेगासस स्पायवेअर आणि क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदी प्रामुख्याने होती.हे वृत्त समोर आल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. राहुल गांधींनी तर मोदी सरकारवर देशद्रोहाचा आरोप केला.



    न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीला उत्तर देताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी ट्विट केले की, “तुम्ही NYT वर विश्वास ठेवू शकता का? ते ‘सुपारी मीडिया’ म्हणून ओळखले जाते.”

    गेल्या वर्षी या प्रकरणावर बराच वाद झाला आणि विरोधी पक्षांनी सरकारवर हेरगिरीचा आरोप करत संसदेत गोंधळ घातला. मात्र, सरकारने हे आरोप फेटाळून लावले होते.इस्रायली स्पायवेअर ‘पेगासस’च्या माध्यमातून भारतीय नागरिकांची कथित हेरगिरी केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने

    गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती.काही आंतरराष्ट्रीय मीडिया गटांच्या संघटनेने दावा केला की पेगाससचा वापर अनेक भारतीय राजकारणी, मंत्री, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि पत्रकार यांच्या विरोधात केला गेला.

    Pegasus Controversy The New York Times is a not Reliable media says Union Minister V K Singh

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा