- 2013 : डी वाय पाटील विद्यापीठात “डॉक्टर ऑफ लेटर्स” प्रदान करताना पवारांचे बाबासाहेबांचा गौरव करणारे भाषण!! Pawar’s duplicity exposed: Babasaheb Purandar’s glory in 2013; In 2022, however, Sharasandhan !!
विशेष प्रतिनिधी
पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय वादात जेम्स लेनचा विषय पुन्हा उफाळून वर आणण्यात आला. यामध्ये शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे दोषाचे बोट दाखवले पण या निमित्ताने पवारांचा दुटप्पीपणा वेगवेगळ्या अंगांनी पुढे येताना दिसतो आहे.
शरद पवार हे आज जरी जेम्स लेन प्रकरणात कै. बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे दोषाचे बोट दाखवत असले, तरी त्यांची अनेक विसंगत विधाने आणि भाषणे या प्रकरणाच्या निमित्ताने सध्या पुढे आली आहेत. पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या गौरवाचे भाषण 2013 मध्ये केले होते. तेव्हा निमित्त होते, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा “डॉक्टर ऑफ लेटर्स” पदवी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना प्रदान करण्याचे…!!
शरद पवार यांच्या हस्ते बाबासाहेबांना सन्माननीय “डॉक्टर ऑफ लेटर्स” पदवी प्रदान करण्यात आली होती. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे इतिहास लेखनातले अतुल्य योगदान यांची जाणकारी याची दखल घेऊन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने “डॉक्टर ऑफ लेटर्स” ही पदवी त्यांना प्रदान केली होती. त्यावेळी शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या गौरवाचे भाषण केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्व महाराष्ट्रातल्या या देशातल्या तरुण पिढीला बाबासाहेबांनी समजावून सांगितले. मराठ्यांचा इतिहास देशाच्या इतिहासात किती मोलाचा आहे आणि त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान किती मोठे आहे, हे बाबासाहेबांमुळे अनेक पिढ्यांमधल्या तरुणांना समजले, असे गौरवोद्गार पवारांनी त्यावेळी काढले होते.
पवारांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया फिरत असून पवारांचा दुटप्पीपणा उघड करण्यासाठी अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. किंबहुना इतिहासकार बाबासाहेबांना त्यांच्या ऐतिहासिक लेखनाच्या योगदानाबद्दल डी वाय पाटील विद्यापीठाने “डॉक्टर ऑफ लेटर्स” ही पदवी प्रदान केली होती, हे या निमित्ताने अधोरेखित होत आहे…!!
भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी संबंधित व्हिडीओ ट्विट केला असून पवारांचा दुटप्पीपणा पाहून त्यांना साष्टांग नमस्कार घालावा असा वाटतो, असे खोचक उद्गार त्यांनी या ट्विटवर काढले आहेत.
Pawar’s duplicity exposed: Babasaheb Purandar’s glory in 2013; In 2022, however, Sharasandhan !!
महत्त्वाच्या बातम्या
- अठरा वर्षीय तामिळनाडू टेबल टेनिसपटू विश्व दीनदयालन याचा अपघातात मृत्यू
- चीनने लडाख हद्दीजवळ उभारले ३ मोबाइल टॉवर; लडाखच्या नगरसेवकाची धक्कादायक माहिती
- Thackeray – Pawar : हनुमंता “त्यांच्या” मनाला “भोंग्यांचा छंद” लागला रे!!
- आसाममध्ये वादळामुळे हाहाकार , १४ जणांचा बळी १२ हजार घरे, झाडे सुध्दा झाली उद्ध्वस्त