• Download App
    सिल्वर ओकवर पवार - राऊत भेट; पवार – वळसे भेटीतही महत्त्वाची चर्चा, मुंबईचे पोलीस आयुक्तही हजर । Pawar-Raut visit on Silver Oak; Pawar - Important discussion in Valse meeting, Mumbai Police Commissioner also present

    सिल्वर ओकवर पवार – राऊत भेट; पवार – वळसे भेटीतही महत्त्वाची चर्चा, मुंबईचे पोलीस आयुक्तही हजर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील घडामोडींवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. यातच आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिलव्हर ओकवर भेट घेतली. मात्र, ही खासगी भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यामध्ये मोठी राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. Pawar-Raut visit on Silver Oak; Pawar – Important discussion in Valse meeting, Mumbai Police Commissioner also present

    शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडून काही प्रकरणांची माहिती घेतली. या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हेही उपस्थित होते.



    शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यातील बैठकीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई, ड्रग्ज प्रकरणावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकारणाची शरद पवार यांनी माहिती घेतली असल्याचे समजते. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खंडणी मागितल्याचा जो आरोप होतोय त्या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या एसआयटीने तपास सुरू केला आहे. त्याबाबतही पवार यांनी माहिती घेतल्याचे समजते.

    खासदार संजय राऊत हे पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. ही एक सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावेळी राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

    Pawar-Raut visit on Silver Oak ; Pawar – Important discussion in Valse meeting, Mumbai Police Commissioner also present

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?