• Download App
    अनिल देशमुखांच्या मागे राष्ट्रवादीचे अन्य नेते खंबीरपणे उभे राहिले नसल्याने पवारांनी व्यक्त केली नाराजी…; पण का आणि केव्हा…??|Pawar expressed displeasure as other NCP leaders did not stand firmly behind Anil Deshmukh

    अनिल देशमुखांच्या मागे राष्ट्रवादीचे अन्य नेते खंबीरपणे उभे राहिले नसल्याने पवारांनी व्यक्त केली नाराजी…; पण का आणि केव्हा…??

    प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईचे बदली केलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी १०० कोटींची खंडणीखोरीचा आरोप केल्यानंतर राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य नेते खंबीरपणे उभे राहिले नाहीत म्हणून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची बातमी झी २४ तासने दिली आहे.Pawar expressed displeasure as other NCP leaders did not stand firmly behind Anil Deshmukh

    सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची काल रात्री बैठक घेतली. त्यात त्यांनी पक्षातील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. अनिल देशमुख यांच्या बाजूने माध्यमांमध्ये भूमिका मांडण्यात पक्षाचे अन्य नेते कमी पडल्याचे पवारांनी बैठकीत स्पष्ट केले. पवारांनी अनिल देशमुखांना दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन क्लीन चिट दिली होती.



    परंतु, आता सीबीआय चौकशीला आणि तपासाला अनिल देशमुख सामोरे जातील तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे पवारांनी बैठकीत स्पष्ट केले आहे. बैठकीला जयंत पाटील, वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख हे नेते उपस्थित होते.

    अनिल देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. पण अनिल देशमुख यांनी या निर्णयाला थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.

    राज्य सरकारनेही या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. सुप्रिम कोर्टाने या याचिका फेटाळून अनिल देशमुखांवर तीव्र शब्दांत ताशेरे मारले होते. हा त्यांना मोठा धक्का होता.

    पवारांच्या बैठकीचे आणि नाराजीचे टायमिंग

    … आणि आता जेव्हा अनिल देशमुख सीबीआय चौकशीला सामोरे जाऊन त्यांचे स्टेटमेंट सीबीआयपुढे नोंदविणार आहेत, तेव्हा शरद पवारांनी सिल्वर ओकमध्ये त्यांच्यासह इतर नेत्यांना बोलवून बैठक घेतली आहे.

    अनिल देशमुख आपले स्टेटमेंट काय देतात… १०० कोटींच्या वसूलीत कोणा – कोणाचा वाटा आहे, असे सीबीआयला सांगतात… याची उत्सुकता जनतेमध्ये आहे, तर धास्ती राष्ट्रवादीमध्ये आहे.

    या आधीच एनआयएच्या सूत्रांनी परमवीर सिंग यांचे स्टेटमेंट संशयित म्हणून नव्हे, तर साक्षीदार म्हणून घेतले आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी बैठक घेतली असल्याने तिला महत्त्व आहे.

    Pawar expressed displeasure as other NCP leaders did not stand firmly behind Anil Deshmukh

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!