Thursday, 8 May 2025
  • Download App
    पवारांनी मला नव्हे, पुतण्याला क्लीन बोल्ड केले, माझ्यामुळे ते अर्धसत्य तरी बोलले; फडणवीसांचा तिखट वार!! Pawar clean bowled not me but his nephew says fadnavis

    पवारांनी मला नव्हे, पुतण्याला क्लीन बोल्ड केले, माझ्यामुळे ते अर्धसत्य तरी बोलले; फडणवीसांचा तिखट वार!!

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या जोरदार वाक्युद्ध सुरू आपण गुगली टाकून फडणवीसांची विकेट 2019 मध्ये काढली, असा दावा शरद पवारांनी केला. त्यावर फडणवीसांनी तिखट प्रत्युत्तर देत पवारांनी आपली विकेट नव्हे, तर पुतण्याची विकेट काढली. त्याला क्लीन बोल्ड केले. उलट माझ्या वक्तव्यामुळे पवार अर्धसत्य तरी बोलले. आता अजित पवार बाहेर येऊन पूर्ण सत्य बाहेर येऊन बोलतील, असा तिखट पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केला. Pawar clean bowled not me but his nephew says fadnavis

    देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी डबल गेम केल्याची टीका केली होती.


    Sharad Pawar : 124 ए राजद्रोहाचे कलम रद्द करण्यासाठी राज्यसभेत बोलू!!; प्रकाश आंबेडकरांविषयीचा प्रश्न टाळला!!


    फडणवीसांची ही टीका पवारांना चांगलीच झोंबली. त्यामुळे त्यांनी आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत आपले सासरे क्रिकेटपटू गुगलीवीर सदु शिंदे यांचा हवाला देत त्यांच्याकडून आपण गुगली शिकल्याने फडणवीसांची विकेट पडली, असा दावा केला फडणवीसांनी ताबडतोब पवारांच्या दाव्याला खोडून काढत पवारांनी आपली नव्हे, तर पुतण्याची विकेट काढली. त्याला क्लीन बोल्ड केले. आता माझ्या वक्तव्यामुळे शरद पवार अर्धसत्य तरी बोलले. काही सत्य बाहेर आले. पण अजित पवार आता बाहेर येऊन पूर्ण सत्य बोलतील, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना हाणला आहे.

    पवार आणि फडणवीस यांच्यातला कलगीतुरा आता अजित पवारांच्या कोर्टात पोहोचला आहे. या दोघांच्याही वादावर अजित पवार नेमके काय बोलतात?, याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

    Pawar clean bowled not me but his nephew says fadnavis

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण

    Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट