नाशिक : Maharashtra महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच रणसंग्रामाला सुरवात झाली आहे. त्याच बरोबर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात रणनीती ठरवायची टक्कर देखील दिसून येत आहे.Maharashtra
महाराष्ट्रात शरद पवार आणि महाविकास आघाडीने मराठा मतांचे ध्रुवीकरण करून त्याचा लोकसभेत लाभ घेतल्यावर त्याचा पुढचा टप्पा विधानसभेसाठी गाठायची तयारी सुरू केली आहे. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सुपडा साफ करण्याची भाषा वापरून महाविकास आघाडीला मराठा मतांच्या ध्रुवीकरणाचा आहेर करायची तयारी चालवली आहे.
पण या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटातून एक वेगळ्याच बातमीची “पुडी” सुटली आहे. तिला “पुडी” म्हणायचे कारण असे, की त्यातून महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा घटक पक्ष काँग्रेसला धक्का देण्याची धूर्त खेळी यातून डोकावली आहे.
काँग्रेसमध्ये म्हणे, ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री करायचे घाटत आहे. विदर्भात काँग्रेसला मोठे यश मिळवायचे. महाराष्ट्रात त्या बळावर पहिल्या नंबरचा पक्ष बनवायचे आणि त्या आधारावर मुख्यमंत्री पदावर दावा सांगून ओबीसी नेत्याला ते पद द्यायचे… आणि त्यातला “राजकीय संदेश” संपूर्ण देशभर पसरवायचा, असा काँग्रेसच्या हायकमांडचा इरादा असल्याचा बातम्या सुटल्या आहेत. आणि नेमक्या याच “पुड्या” आहेत.
एकीकडे पवार आणि त्यांच्या पक्षाचे नेते मराठा समाजाचे ध्रुवीकरण करून मते खेचणार. आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणून संख्याबळ वाढविणार आणि त्याचवेळी काँग्रेस मात्र ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री करेल, अशा बातम्या सोडून काँग्रेसचा मराठा मतांचा वाटा घटविणार असला डाव रचला जातोय की काय??, असा दाट संशय येण्यासारखी परिस्थिती आहे.
कारण लोकसभा निवडणुकीत एक तर काँग्रेसला सर्वात चांगले यश मिळाले. त्यात मराठा मतांचा वाटा निश्चित मोठा राहिला. त्या खालोखाल उद्धव ठाकरेंच्या पक्षाला यश मिळाले आणि त्यानंतर पवारांच्या पक्षाचा नंबर लागला. मग भले पवारांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट 80 % असेल, पण म्हणून काँग्रेसच्या आणि ठाकरे सेनेच्या यशाची वस्तुस्थिती बदलत नाही.
अशावेळी भाजपच्या कोअर व्होट बँकेमध्ये सेंधमारी करण्यासाठी काँग्रेस ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री करेल, असे वरवर तर्कसंगत वाटणारे राजकीय “तर्कट” बातमी म्हणून सोडायचे कौशल्य मराठा एकगठ्ठा मतांच्या ठेकेदारांनी दाखविल्याचे दिसून येत आहे.
पण यातून भाजपच्या व्होट बँकेमध्ये सेंधमारी होईल की नाही, हा भाग अलहिदा. पण आत्ताच्या महाराष्ट्रातल्या मराठा – मराठेतर वादात काँग्रेसच्या मराठा मतांमध्ये नक्कीच सेंधमारी होईल आणि त्यांच्या यशाचे प्रमाण घटेल, हा तर “काँग्रेस ओबीसी मुख्यमंत्री देईल” अशी बातमीची “पुडी” सोडण्यामागे इरादा नाही ना, असा दाट संशय घेण्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे. यातून काँग्रेसमधल्या “सक्षम” मराठा नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांमधील “हवा” काढून घेण्याचाही पक्का इरादा दिसतो आहे. कारण काँग्रेसचे मुख्यमंत्री नेहमीच मराठी माध्यम निर्मित “चाणक्या”ला “जड” गेले आहेत.
Pawar camp may have spread the news of Congress OBC chief minister
महत्वाच्या बातम्या
- Atul Parchure कर्करोगावर यशस्वी मात करूनही अतुल परचुरे यांची एक्झिट
- Bahraich violence : उत्तर प्रदेशातील बहराइच हिंसाचारात तरुणाच्या मृत्यूनंतर प्रकरण तापले!
- Baba Siddiqui : 2000 कोटींचा SRA घोटाळा, बाबा सिद्दिकीची 464 कोटी रुपयांची संपत्ती जप्त; हत्येचा वेगळ्या पैलूंच्या आधारे देखील तपास!!
- Vidhan Parishad : रामराजेंचे दोन डगरींवर हात; संजीवराजेंना पवारांकडे पाठवून स्वतःची विधान परिषदेची आमदारकी टिकवण्यासाठी अजितदादांनाच