• Download App
    अदानी - पवार भेट : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जेपीसीचा मुद्दा थंड्या बस्त्यात; 5 प्रादेशिक पक्षांना "मॅनेज" करण्याची चर्चा!! Pawar - adani meeting : discussions on managing 5 regional parties to contain Congress demand for jpc probe

    अदानी – पवार भेट : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जेपीसीचा मुद्दा थंड्या बस्त्यात; 5 प्रादेशिक पक्षांना “मॅनेज” करण्याची चर्चा!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : चारच दिवसांपूर्वी झालेली शरद पवार – गौतम अदानी भेट नेमकी कशासाठी होती??, यावर मोठे तर्कवितर्क लढविले गेले असले तरी, ती भेट नेमकी कशासाठी होती??, यावर ना शरद पवारांनी भाष्य केले, ना गौतम अदानींनी त्यावर काही वक्तव्य दिले. त्यामुळे पवार अदानी भेटीचे गूढ आजही कायम आहे. Pawar – adani meeting : discussions on managing 5 regional parties to contain Congress demand for jpc probe

    तसेही गौतम अदानी स्वतःहून क्वचितच कोणती वक्तव्ये देतात, पण पवार भेटी संदर्भात अदानी समूहाने देखील कोणताही खुलासा दिलेला नाही. त्यामुळे पवार – अदानी भेटी संदर्भात बातम्यांची बरीच राळ उडाली आणि अर्थातच ती राहुल गांधींनी गौतम अदानी समूहावर केलेल्या 20000 कोटी रुपयांच्या घोटाळे संदर्भात होती. गौतम अदानींच्या शेल कंपनीत 20000 कोटी रुपये आले कुठून??, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे आणि त्या सवालावर ते आजही कायम आहेत. त्यामुळेच काँग्रेस पक्षाने अदानी मुद्द्यावर संयुक्त संसदीय समितीकडून चौकशीची मागणी लावून धरली आहे.


    अदानी मुद्द्यावर पवारांचा वेगळा सूर, खुद्द अदानी समूहाचा खुलासा, तरीही राहुल गांधी – काँग्रेस “टार्गेटवर” ठाम!!


    अदानी समूहाने 23900 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा तपशील देऊन जाहीर खुलासा केला होता, पण तरी देखील काँग्रेस आपल्या मूळ मागणी पासून मागे हटलेली नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि गौतम आदमी यांची सिल्वर ओक वर भेट झाल्याचे उघड आहे.

    पण त्या भेटीत तब्बल 2 तास झालेल्या चर्चेत नेमके काय घडले होते??, याचे तपशील मात्र आत्तापर्यंत उघड झालेले नव्हते. राजधानी नवी दिल्लीतील अंतर्गत गोटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांनी आपले राजकीय संबंध वापरून 5 प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना अशा पद्धतीने “मॅनेज” करावे की त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अदानी मुद्द्यावर जेपीसीचे गठन हा मुद्दाच थंडा बस्त्यात जावा. जेणेकरून या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात काँग्रेसच्या बाजूने फारसे कोणी उभे राहणार नाही याची “काळजी” पवारांनी घ्यावी, अशी अपेक्षा अदानींनी व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यासाठी अदानींनी काही “विशिष्ट ऑफर” दिल्याच्याही दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टीने प्रादेशिक पक्षांसाठी त्या फार महत्त्वाच्या असल्याचे मानले जात आहे.

    पवार आणि अदानी मैत्री संबंध लक्षात घेता आणि एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीतून पवारांनी अदानींची बाजू उचलून धरल्याचा मुद्दा पाहता सिल्वर ओक मधल्या पवार – अदानी भेटीत 5 प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना “मॅनेज” करण्यासंदर्भात चर्चा झाली असल्याचा कयास दिल्लीतल्या सूत्रांनी लावला आहे आणि मुंबईतल्या अंतर्गत गोटातल्या सूत्रांनीही त्याला दुजोरा दिला आहे

    Pawar – adani meeting : discussions on managing 5 regional parties to contain Congress demand for jpc probe

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य