- मनसेचे घणाघाती टीकास्त्र Paper rupture since the Mahavikas Aghadi government came to power in Maharashtra; Now Thane Municipal Corporation’s budget has also burst !!
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून सर्वच परीक्षांच्या पेपर फुटीचे पेव फुटले आहे. वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर फुटतात तसा ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्पही फुटल्याने गोपनीयतेचा भंग झाला आहे. पालिकेचे अधिकारीच चापलूसी करीत असल्याने असे गंभीर प्रकार घडत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली
ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प सादरीकरणाची स्थायी समितीची विशेष सभा ठाणे महापालिका भवनातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात वेबिनारद्वारे आयोजित करण्यात आली होती. या वेबिनार बैठकीतील अर्थसंकल्पाचे विवेचन काही दैनिकांसह सर्वत्र आधीच जाहीर झाल्याने अर्थसंकल्प फुटल्याचे उघड झाले. त्यामुळे ठाणे महापालिका प्रशासनाकडून अर्थसंकल्पाबाबतची गोपनीयता राखली न गेल्याचे दिसून आल्याने यावरून ठाण्यात गदारोळ उठला. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही अर्थसंकल्पाच्या फूटीवरून प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून दररोज काही न काही फुटत आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा, म्हाडा परीक्षेचे पेपर फुटले. आता तर ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्पही फुटला, काही अधिकाऱ्यांनी हा अर्थसंकल्प फोडला. काही अधिकाऱ्यांनी आपली खुर्ची टिकावी, एखादे पद मिळावे यासाठी संगनमताने असले उद्योग केलेत. अशा प्रकारे अर्थसंकल्प फोडून काही अधिकारी चापलूसी करत असून पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी याची तात्काळ गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा मनसे आंदोलन छेडणार, असा इशारा अविनाश जाधव यांनी यावेळी दिला.
Paper rupture since the Mahavikas Aghadi government came to power in Maharashtra; Now Thane Municipal Corporation’s budget has also burst !!
महत्त्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीच्या सरकारचे स्टेरिंग कोणाच्या हाती?; अजितदादा – संजय राऊत यांची परस्पर विसंगत वक्तव्ये!!
- ‘शक्तिमान’ आता रुपेरी पडद्यावर झळकणार; मुकेश खन्ना यांच्याकडून चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
- हिजाब वादाचे पडसाद; बुलडाण्यात १४४ कलम लागू; मोर्चा, निर्दशने आणि आंदोलनास मनाई
- कर्नाळा बँकेतील ठेवीदारांना मिळाले पैसे : आमदार महेश बालदी यांनी मानले पंतप्रधान मोदी यांचे आभार