• Download App
    पाप, सुसु......पुन्हा चंपा म्हणालात तर तुमच्या कुटुंबांतल्यांचा शॉर्टफॉम करील, चंद्रकांत पाटील यांचा इशारा|Pap , Susu if you say Champa again, it will shortform your family members, Chandrakant Patil warns

    पाप, सुसु……पुन्हा चंपा म्हणालात तर तुमच्या कुटुंबांतल्यांचा शॉर्टफॉम करील, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

    अजित पवारांना मला एक इशारा द्यायचा आहे. खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचेसुद्धा जे शॉर्ट फॉर्म आहेत, त्यांच्या मुलापासून सर्वांचे शॉर्ट फॉर्म मला करावे लागतील, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.Pap , Susu if you say Champa again, it will shortform your family members, Chandrakant Patil warns


    विशेष प्रतिनिधी 

    पंढरपूर : अजित पवारांना मला एक इशारा द्यायचा आहे. खूप दिवस मला चंपा म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचेसुद्धा जे शॉर्ट फॉर्म आहेत,

    त्यांच्या मुलापासून सर्वांचे शॉर्ट फॉर्म मला करावे लागतील, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाचा शॉर्टफॉर्म पाप, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा शॉर्टफॉर्म सुसु असा होतो.



    त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी हा इशारा दिला आहे. पाटील म्हणाले, अजित पवारांना राज्यात करोनाचं संकट भीषण झालेलं असतानाही दोनदा येऊन राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या लोकांच्या घरी जावं लागतं.

    हा त्यांचा स्वभाव नाही, तो शरद पवारांचा स्वभाव आहे. निवडणूक त्यांच्या हातून गेल्याचं हे लक्षण आहे. ज्याप्रकारे ते बोलत आहेत त्यावरुन पायाखालची जमीन सरकली आहे असं दिसत आहे.पायाखालची जमीन सरकली ही जिभेवरचा ताबा सुटतो.

    अजित पवारांना काय झालं आहे माहिती नाही. पण अलीकडच्या काळात ते जोरात आहेत. हिंदीमध्ये म्हण आहे की सौ चुहे खाके बिल्ली हज को चली.मला कधी कधी आश्चर्य वाटतं. शरद पवारांवरील माझी पीएचडी अद्याप अपूर्ण आहे.

    पण आता अजित पवारांवर मी एम फील करणार आहे. त्यासाठी मी काही प्राध्यापकांना भेटणार आहे. इतके सगळे प्रकार करुनही छातीठोकपणे कसं बोलतात याचा अभ्यास मी करणार आहे. म्हणजे यांच्यावर सिंचनाच्या केसेस आहेत,

    राज्य सहकारी बँकेची चौकशी संपलेली नाही. महाराष्ट्रात जो कारखाना बंद पडेल तो हे विकत घेणार. पवार कुटुंबाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किती साखर कारखाने आहेत याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे.

    इतकं केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हे उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही हे उपमुख्यमंत्री.उद्या येणार नाही पण कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री असतील, असा हल्लाबोलही पाटील यांनी केला. ‘

    Pap , Susu if you say Champa again, it will shortform your family members, Chandrakant Patil warns

    Related posts

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक