प्रतिनिधी
बीड – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या आल्या. त्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण नाराज नसल्याचा खुलासा केला. पण पंकजा मुंडे नाराज नसल्या तरी त्यांचे समर्थक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाराज झाले असून त्यांनी भाजपच्या विविध पदांच्या राजीनाम्याचे सत्र सुरू केले आहे. pankaja munde supporters unhappy over cabinet reshffle, resigned from various BJP party posts
पंकजा मुंडे नाराज नसतील पण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याने आमची नाराजी कायम आहे, असे सांगत सर्वात अगोदर भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिला आहे.
त्यांच्या पाठोपाठ आज (शनिवार) जिल्हा परिषद सदस्या सविता बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर आणि भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संग्राम बांगर, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.लक्ष्मण जाधव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप, समाज माध्यम प्रमुख अमोल वडतीले, तालुकाध्यक्ष महादेव खेडकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांच्यासह २० पेक्षा जास्त पदाधिकार्यांनी पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपवले.
अंबाजोगाईतील भाजपा नगरसेवकांसह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदाचे राजीनामे घेऊन मुंबईला गेले आहेत. मुंडे-महाजन समर्थकांची लवकरच बैठक होणार असल्याचेही सोशल मीडियातून पसरले आहे. शनिवारी जिल्हा परिषद सदस्य आणि पक्ष पदाधिकार्यांचे जवळपास २० राजीनामे आले असुन, ते पक्ष नेतृत्वाकडे पाठवले जातील असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सांगितले.
मात्र, या राजीनामा सत्रावर स्वतः पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोन्ही भगिनी कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आपल्या समर्थकांच्या बंडाला पंकजा मुंडे या हवा देऊन मोदींशी पंगा घेतात की ते शांत करून आपले राजकीय करिअर भाजपमध्ये शाबूत ठेवतात, याकडे राजकीय निरीक्षक लक्ष ठेवून आहेत.
शिवाय पंकजा मुंडे यांच्या नाराज नसल्याची जाहीर भूमिका घेतल्यानंतरही जिल्हाभरातील पदाधिकार्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसल्यामुळे पक्षाचे राज्य आणि केंद्रीय नेतृत्व याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहते, याकडे लक्ष लागले आहे.
pankaja munde supporters unhappy over cabinet reshffle, resigned from various BJP party posts
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडचा व्लॉगर कार्ल रॉक भारतात ब्लॅकलिस्ट, Visa नियमांच्या उल्लंघनाचा आरोप
- केजरीवाल सरकारने DTC बसेसच्या खरेदीत केला 3500 कोटींचा घोटाळा, भाजप आरोपांवर उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले- आश्चर्य वाटतंय!
- 36 लाख दूध उत्पादकांच्या ‘अमूल’ने केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या निर्मितीवर मानले आभार, आणखी एका सहकार क्रांतीचे केले स्वागत
- चीनचा नवा डाव : जेनेटिक इंजिनिअरिंगने सैनिकांना शक्तिशाली बनवत आहे ड्रॅगन, अमेरिकाही चिंतित
- दिल्लीमध्ये ध्वनी प्रदूषण केल्यास 1 लाखापर्यंत दंड, वाचा पूर्ण यादी, काय-काय केल्याने होऊ शकतो दंड!