ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पंकजा यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरलं आहे. PANKAJA MUNDE PRESS: What’s going on in your Maharashtra? That’s what people ask me; Pankaja Munde targets state government over OBC reservation
विशेष प्रतिनिधी
मुंबई : तुमच्या महाराष्ट्रात चाललयं काय ? असं लोक मला विचारतात, या शब्दांत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे . त्या मुंबईत भाजप मुख्यालयात आज मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होत्या. ‘महाराष्ट्राला एक पुरोगामी राज्य म्हणून संपूर्ण देशाचे लोक बघत असतात. आज राज्याची परिस्थिती बदललीये. पूर्वी लोक महाराष्ट्राचं उदाहरण घेऊन काम करत होते. आता मात्र लोक मला विचारतात की तुमच्या महाराष्ट्रात काय चाललंय?
- पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे.
- ओबीसींना अंधकारात लोटणारा निर्णय म्हणजे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले.
- इम्पेरिकल डेटाची मागणी न्यायालयाकडून सातत्याने होत आहे.
मात्र सरकारकडून दिले जात नाही. - या सरकारला ओबीसी आरक्षण असुरक्षित करायचे का?आरक्षण संरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचे ढोंग सरकारने केले आहे.
- या अध्यादेशाविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
- सरकारने १५ महिन्यात डेटा गोळा केला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी निधी द्यायला पाहिजे
- प्रत्येक बलाढ्य नेत्यांच्या चुकीच्या कामांसाठी निधी आहे. पण मागासवर्गीय आयोगाला निधी उपलब्ध करुन दिलेला नाही.
- प्रत्येक गोष्ट, निर्णय यासाठी केंद्राकडे बोट दाखवले जाते.
- ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानंतर रद्द होईपर्यंतच्या कालावधीत राज्य सरकारने पावलं उचलली असती, तर ओबीसींचं आरक्षण वाचलं असतं.
- आपल्याला इम्पेरिकल डेटाची व्याख्या माहीत आहे का?, असा सवालही पंकजा यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
- ‘एसटी कर्मचाऱ्यांचा संप गंभीर आहे. मी देखील एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. मात्र, सरकारने अजूनही तोडगा काढत नाही. काही निर्णय घेणे नक्कीच कठीण आहे. पण, संभाषणाने मार्ग निघू शकतो. पण, सरकार संभाषण करायला तयार नाही,’ असंही पंकजा यांनी म्हटलं आहे.
PANKAJA MUNDE PRESS : What’s going on in your Maharashtra? That’s what people ask me; Pankaja Munde targets state government over OBC reservation
महत्त्वाच्या बातम्या
-
- ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर तोफा भाजपवर; पण फोडणार काँग्रेसच; कीर्ति आझाद तृणमूळ काँग्रेसमध्ये येणार
- रामायण स्पेशल ट्रेनमध्ये वेटर्सचा भगवे कपडे घातल्याने वाद, साधू-संतांनी घेतला आक्षेप
- सीबीआय, ईडी, रॉ यांना विनापरवानगी कोणाचीही माहिती घेण्याचा अधिकार, वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयकावरील अहवाल संसदीय समितीने स्वीकारला, काँग्रेस आणि तृणमूलचा विरोध
- सरन्यायाधीश एन. व्ही.रमणा : लोकशाहीतील सर्वच सत्ताधाऱ्यांनी दिनक्रम सुरु करण्यापूर्वी स्वतःच आत्मपरीक्षण करावं