विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक राज्यात सध्या चांगलीच गाजत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीसाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या एका प्रचारसभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची चांगलीच खिल्ली उडवली होती.Pandharpur Tuesday by-election riot of political allegations
मात्र यावर गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं ‘असली टगेगिरीची भाषा अजित पवारांना शोभत नाही. बोलायचं टग्यासारखं आणि रडायचं बाईसारखं अशी अजित पवारांची गत आहे’, असा जोरदार टोला गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना लगावला होता.
त्यांच्या या टीकेला पुणे जिल्ह्यातील मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उत्तर दिले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांना ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातील मकरंद अनासपुरे यांची उपमा देत त्यांच्यावर सडकून टीका देखील यावेळी त्यांनी केली.
अजित पवारांचे बोलणं टग्याचं आणि रडणं बाईसारखं अशी गत आहे. ईडीची (ED) नोटीस आल्यानंतर तुम्हाला राज्याने रडताना पाहिलेले आहे. अजित पवारांचे सगळे राजकारणच चुलत्यांच्या जीवावर आहे. पण आमचे राजकारण हे बारा बलुतेदार आणि गोरगरिबांच्या पाठींब्यावर आहे’, असे गोपीचंद पडळकर म्हणाले होते.
काय म्हणाले होते अजित पवार
अजित पवार यांनी कासेगावच्या सभेत पडळकरांवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, “सध्या एक नेता तुमच्याकडे जोरदार भाषणे करत फिरतोय, त्याचे डिपॉझिट सुद्धा त्याला बारामतीमध्ये वाचवता आलं नव्हतं
आणि आता हा कोणाच्या तोंडाने मतं मागतोय? ज्याला स्वतःचे डिपॉझिट वाचवता आलं नाही तो तुम्हाला सल्ले देतोय.यावर चांगलेच राजकारण तापलेले दिसून येत आहे.