• Download App
    पंढरपूर, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना शिंदे - फडणवीस सरकारची मान्यता|Pandharpur Akkalkot pilgrimage development plans approved by Shinde-Fadnavis government

    पंढरपूर, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना शिंदे – फडणवीस सरकारची मान्यता

    प्रतिनिधी

    मुंबई : जगभरातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान पंढरपूर आणि श्री स्वामी समर्थांचे तीर्थक्षेत्र अक्कलकोट यांच्या विकास आराखड्यांना महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने मान्यता दिली आहे.Pandharpur Akkalkot pilgrimage development plans approved by Shinde-Fadnavis government

    मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि ३६८ कोटी रुपयांच्या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास आज मान्यता देण्यात आली.



    राज्यातील ज्या मंदिर, देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते त्यांचे डिजिटल मॅपिंग करण्यात यावे. जेणेकरून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाने तातडीने १० कोटी रुपयांचा निधी पंढरपूर नगरपरिषदेस वितरित करावा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले. यात्रा अनुदान ५ कोटींवरुन १० कोटी रुपये करण्याची घोषणाही त्यांनी केली.

    पंढरपूर मंदिर विकास आराखड्यात ७३ कोटी ८० लाख रुपयांची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन, पर्यटक सुविधा नियोजन करण्यात येणार आहे. जतन आणि संवर्धन कामांमध्ये अनियोजित अनावश्यक जोडण्या काढणे, पाणी गळती रोखणे, दगडी बांधकाम आवश्यकतेनुसार दुरूस्त करणे, मंदीर परिसरातील दीपमाळांची पुनर्बांधणी करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत.

    ३६८ कोटी ७१ लाख रुपयांच्या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये वाहनतळ, रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक त्या भुसंपादनाला मंजुरी यावेळी देण्यात आली. प्रस्तावित आराखड्यामध्ये वाहनतळ, वॉटर एटीएम, रस्ते विकास, शौचालय निर्मिती, हत्ती तलाव उद्यानांचा विकास, व्यापारी केंद्र, भक्त निवास, चौक सुशोभीकरण या कामांचा समावेश आहे.

    Pandharpur Akkalkot pilgrimage development plans approved by Shinde-Fadnavis government

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला