• Download App
    वसतीगृहे बंद करण्याचा फतवा 'स्टुडंट हेल्पिंग हँड'चा उपोषणाचा इशारा|Order to close hostel Student Helping Hand's hunger strike warning

    वसतीगृहे बंद करण्याचा फतवा ‘स्टुडंट हेल्पिंग हँड’चा उपोषणाचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : शाळा व काॅलेज परत सुरु करण्यात येत आहेत. दुसरीकडे शासन समाजकल्याण विभागाच्या परीपत्रका मध्ये वसतीगृहे बंद करा. विद्यार्थ्यांना राहू देऊ नका,असा आदेश काढत आहे. पहिल्या लाटेनंतर 80 टक्के विद्यार्थी अजूनही वसतीगृहांमध्ये आलेच नाहीत.Order to close hostel Student Helping Hand’s hunger strike warning

    एक विद्यार्थी एका खोलीत राहील अशी परिस्थितीती आहे. मग अडचण काय आहे? अशी दुटप्पी भूमिका सरकार का घेत आहे, असा प्रश्न स्टुडंट हेल्पिंग हँड अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी उपस्थित केला.



    आंबेकर म्हणाले, सध्या 1000 क्षमतेचे विश्रांतवाडी येथील समाजकल्याण विभागाचे वसतीगृह आहे. या ठिकाणी फक्त 70 विद्यार्थी तिथे आले होते. अशीच परिस्थिती राज्यातील 441 सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहांची आहे.

    सर्वांचे लशीचे दोन्ही डोस झाले, तरीही विद्यार्थ्यांना तिथून जा, मेस बंद करु असे प्रशासनातील मंडळी सांगत आहेत. विद्यार्थी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.

    राज्याच्या कानाकोपर्‍यातून विद्यार्थी आताच कुठे आले. व्यावसायिक कोर्सेसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल आताही सुरू आहेत. विद्यार्थी अशा वेळा करणार काय? विद्यार्थी वसहतीगृह सोडणार नाहीत, असा ठाम निर्धार ‘स्टुडंट हेल्पिंग हँड’च्या वतीने आज करण्यात आला.

    जर विद्यार्थीचे साहित्य प्रशासनाने बाहेर काढले तर वसतीगृहाच्या गेटवर उपोषण करण्यात येणार, असा इशारा आंबेकर यांनी दिला.

    Order to close hostel Student Helping Hand’s hunger strike warning

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    CM Devendra Fadnavis : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

    महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले, नवनाथ बन म्हणाले,’देवा’भाऊ घरात बसणारे नाही काम करणारे मुख्यमंत्री

    Vanchit मुंबईत काँग्रेस आणि वंचित दोघेही अपयशी; तरी वंचितचा काँग्रेसला टोमणा!!