• Download App
    महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्याचा विरोधकांचा खोटा नॅरेटिव्ह; शिंदे - फडणवीसांनी आकड्यांसकट केले फायरिंग!!|Opponents' false narrative of wiping leaves from Maharashtra's face; Shinde - Fadnavis fired by numbers!!

    महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्याचा विरोधकांचा खोटा नॅरेटिव्ह; शिंदे – फडणवीसांनी आकड्यांसकट केले फायरिंग!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : तिसऱ्या टर्म मधल्या पहिल्या अर्थसंकल्पात केंद्रातल्या मोदी सरकारने आपले राजकीय भान दाखवून युवकांच्या हाताला रोजगार, शेतीक्षेत्र, महिला आणि गरीब कल्याण यासाठी भरघोस तरतुदी केल्या. उद्योग क्षेत्रासाठी विविध तरतुदी करून रोजगार निर्मितीसाठी चालना दिली. त्याच वेळी आंध्र प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांचा उल्लेख करून त्यांच्या विकासासाठी एकत्रित 75000 कोटींची तरतूद केली.Opponents’ false narrative of wiping leaves from Maharashtra’s face; Shinde – Fadnavis fired by numbers!!

    मात्र या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मोदी सरकारने काही दिले नसल्याचा कांगावा विरोधकांनी केला. विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. रोहित पवारांनी तर शिंदे – फडणवीसांची केंद्रातील “लायकी” काय हे अर्थसंकल्पाने दाखवून दिल्याचे असा अश्लाघ्य वक्तव्य करून त्यांना डिवचले.



    पण प्रत्यक्षात केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला नेमके काय मिळाले याची यादीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील अर्थसंकल्पात महाराष्ट्राला कशा पद्धतीने समाधानकारक स्थान मिळाले आहे, हे उलगडून सांगितले.

    केंद्रीय अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राला काय मिळाले??, फडणवीसांनी यादी वाचली ती अशी :

    – विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प : 600 कोटी

    – महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार : 400 कोटी

    – सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर : 466 कोटी

    – पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प : 598 कोटी

    – महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : 150 कोटी

    – MUTP-३ : 908 कोटी

    – मुंबई मेट्रो : 1087 कोटी

    – दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर : 499 कोटी

    – MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी : 150 कोटी

    – नागपूर मेट्रो : 683 कोटी

    – नाग नदी पुनरुज्जीवन : 500 कोटी

    – पुणे मेट्रो : 814 कोटी

    – पुण्यातील मुळा मुठा नदी संवर्धन : 690 कोटी

    “समाजाच्या सर्व घटकांना समाधानी करणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केला आहे. करदात्यांना सवलती दिल्या आहेत. 50000 ची स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवून 75000 केली आहे. सामान्यांसाठी जीवनावश्यक बाबींची तरतूद यात करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प सर्व घटकांना समाधानी करणारा अर्थसंकल्प आहे” :

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    Opponents’ false narrative of wiping leaves from Maharashtra’s face; Shinde – Fadnavis fired by numbers!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस