विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘Gulabrao Patil शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी “ऑपरेशन टायगर 3.0” सुरू झाल्याचा दावा करत आणखी 14 हून अधिक आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.’Gulabrao Patil
14 पेक्षा जास्त आमदार आमच्या संपर्कात
गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की, ठाकरे गटातील अनेक आमदार सध्या शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. सहा खासदारांनंतर आता 14 हून अधिक आमदारही शिंदे गटात येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात आणखी मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले.’Gulabrao Patil
‘दाढीवर हात फिरवला की ऑपरेशन यशस्वी’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना गुलाबराव पाटील म्हणाले, “ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झाले आहे. एकनाथ शिंदे फार बोलत नाहीत, ते फक्त दाढीवर हात फिरवतात. त्यांनी दाढीवर हात फिरवला म्हणजे ऑपरेशन यशस्वी होणार, हे निश्चित असते. हे खुद्द आदित्य ठाकरे यांनीही मान्य केले आहे.”
त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टोला
ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघांचा उद्धव ठाकरे तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यावर भाष्य करताना गुलाबराव पाटील यांनी खोचक टिप्पणी केली.
“उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघात फिरलेच पाहिजे. मुलाने काम केले नाही, तर बापाने ते करावेच लागते,” असा टोला त्यांनी लगावला.
संजय दिना पाटील यांनी माफी मागावी
पत्रकार परिषदेत पत्रकारांशी झालेल्या वादामुळे चर्चेत आलेले खासदार संजय दिना पाटील यांनाही गुलाबराव पाटील यांनी सार्वजनिक सल्ला दिला.
“पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तो आपला आरसा असतो. आरशावर दगड मारू नये. राजकारणात मतभेद असू शकतात, पण शिवीगाळ किंवा मारामारी योग्य नाही. संजय दिना पाटील यांनी या प्रकरणात ‘सॉरी’ म्हणायला काहीच हरकत नाही,” असे ते म्हणाले.
गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यांमुळे ‘ऑपरेशन टायगर 3.0’ची चर्चा पुन्हा एकदा रंगली असून, ठाकरे गटातील आणखी आमदार पक्ष सोडणार का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Operation Tiger 3.0 Started”: Gulabrao Patil Claims 14 MLAs in Touch
महत्वाच्या बातम्या
- EPFO : EPFOचे ऑनलाइन पोर्टल 26 ते 28 जूनदरम्यान बंद; PF काढणे, ट्रान्सफर आणि क्लेम प्रक्रियेवर परिणाम
- राम मंदिरात चोरी झाली, बरे झाले; विरोधकांचे सनातन धर्मावरचे प्रेम उफाळून वर आले!!
- राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी टिन्नू यादवसह 8 आरोपींना रात्री उशिरा अटक; आज कोर्टात करणार हजर!!
- Nasrapur Case : नसरापूर खटला; आरोपी भीमराव कांबळे दोषी, कोर्ट 29 जूनला सुनावणार अंतिम शिक्षा; वाचा प्रकरणाची टाइमलाइन