प्रतिनिधी
मुंबई : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी तेलंगण आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यावर आणि दोन राज्यांमधील सहकार्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे.Only Telangana-Maharashtra development and cooperation issue in Pawar’s tweet after KCR visit; Opposition unity issue “disappears”
के. चंद्रशेखर राव यांनी आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांचे अधिकृत निवासस्थान “वर्षा”वर भेट घेतली. तेथे पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर त्यांनी शरद पवार यांची “सिल्वर ओक” या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे. तेलंगण आणि महाराष्ट्राच्या विविध विकासाच्या मुद्द्यावर तसेच दोन राज्यांमधील सहकार्याच्या मुद्द्यावर तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी माझ्या निवासस्थानी चर्चा झाली. त्यांना भेटून मला आनंद झाला, असे ट्विट पवार यांनी केले आहे.
भाजप विरोधी सर्व प्रादेशिक पक्षांचे ऐक्य साधण्यासाठी चंद्रशेखर राव हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटणार आहेत, अशा आशयाच्या बातम्या दिवसभर चालल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ठाकरे आणि चंद्रशेखर राव यांनी त्या बातम्यांना दुजोरा दिला. महाराष्ट्रातून सुरू होणारे हे ऐक्याचे आंदोलन पुढे जाऊन यशस्वी होईल, असे चंद्रशेखर राव म्हणाले.
परंतु शरद पवार यांनी आपल्या ट्विट मधून भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांच्या एकजुटीचा उल्लेखही केलेला नाही. उलट पवारांनी फक्त तेलंगण आणि महाराष्ट्रातील विकासाचा मुद्दा तसेच दोन राज्यांमधल्या सहकार्याचा मुद्दा आपल्या ट्विटमध्ये अधोरेखित केला आहे. याचा नेमका राजकीय अर्थ काय काढायचा? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Only Telangana-Maharashtra development and cooperation issue in Pawar’s tweet after KCR visit; Opposition unity issue “disappears”
महत्त्वाच्या बातम्या
- पत्रकार परिषद ठाकरे – केसीआरची; चर्चा : “रोखठोक” राऊतांच्या प्रश्नोत्तरांपासून दूर पळण्याची!!
- सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशनची संख्या २.५ पट वाढली
- मोदींविरोधात प्रादेशिक एकी; पण काँग्रेसची निरगाठ सोडवणार कशी…?? – देशाच्या “राजकीय तलावात” प्रादेशिक नेत्यांचे कडेकडेनेच पोहणे..
- भाजपविरोधी मुख्यमंत्र्यांचे ऐक्य : उद्धव ठाकरे – केसीआर “वर्षा”वर भेट; काँग्रेसवर भाष्य करण्याचे केसीआरनी टाळले!!