वृत्तसंस्था
पुणे: पुणे महापालिकेने सोमवार ते शुक्रवार जमावबंदी लागू केली. त्यात अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली आहे. गेल्या आठवड्यात सकाळी तोबा गर्दी झाली होती. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन नागरिकांनी केले. ते अत्यंत धोकादायक आहे. त्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. बाजारातील किरकोळ विक्रेते, डमी व लिंबू विक्रेत्यांवर सोमवारपासून बंदी घातली आहे. Only pass holders can enter the market yard of Pune
मार्केटयार्डात रिक्षाला पास असेल, तरच बाजारात प्रवेश दिला जाणार आहे. किरकोळ विक्रीही थांबवली आहे. आडते आणि खरेदीदारांना बाजार समितीकडून पास दिले जातील. प्रवेशद्वारावर ओळखपत्र आणि पास दाखविल्याशिवाय बाजारात प्रवेशबंदी आहे, अशी समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.
गरड म्हणाले, सहपोलिस आयुक्त रविंद्र शिसवे, अप्पर पोलिस आयुक्त संजय शिंदे, परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी बाजाराची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले. बाजारात सुमारे दोन हजार डमी विक्रेते आहेत. ते गाळ्यासमोर विक्री करतात.
त्यामुळे ग्राहकांचीही गर्दी होते. त्यामुळे डमी तसेच लिंबू विक्रेत्यांवर बंदी घातली आहे. आडते तसेच खरेदीदारांना पास दिला जाणार आहे. शेतीमाल घेऊन येणार्या गाड्यांना एक नंबरच्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे, तर खरेदीदारांच्या गाड्यांना 4 नंबरच्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे.
.. तरच वाहनतळावर प्रवेश
पास असेल, तरच वाहनतळावर वाहन लावण्यास परवानगी दिली जाणार आहे. बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस आणि वाहतूक पोलिस गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करणार आहेत. गर्दीवर नियंत्रणासाठी ३० पोलिस कर्मचारी असणार आहेत.
नियम मोडणार्यांवर ते दंडात्मक कारवाई करणार आहेत. किरकोळ खरेदी करणार्यांना प्रवेश दिला जाणार नाही. गुळ-भुसार विभागातही शनिवारी तसेच रविवारी माल घेऊन येणार्या गाड्यांना त्या त्या गाळ्यासमोर थांबण्याची परवानगी दिली आहे. मात्र सोमवारी दुपारी १२ नंतर या गाड्यांतील माल उतरवून घेता येणार असल्याचेही मधुकांत गरड यांनी सांगितले.
नियम मोडाल तर कारवाई
मार्केट यार्डातील विविध विभागात माल घेऊन येणार्यांची संख्या मोठी आहे. तसेच खरेदीदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ते बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहेत. सोमवारपासून मार्केटयार्डात नियम मोडणार्यांवर कडक कारवाई केली जाईल.
सर्व रस्त्यांवर बॅरिगेटस्
मार्केटयार्डात येणार्या रस्त्यांवर सोमवारपासून बॅरिगेटस् लावण्यात येणार आहेत. बिबवेवाडी रस्ता, शिवनेरी रस्ता, पोस्ट ऑफीस कार्यालयासह छोट्या रस्त्यांवरही बॅरिगेटस लावले जाणार आहेत. शिवनेरी रस्त्यासह अन्य रस्त्यांवरून बाजारात येणार्या रस्त्यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे सोमवारपासून पास असेल, तरच मार्केटयार्डातील विविध भागात प्रवेश दिला जाणार आहे. अन्यथा रिकाम्या हातानी परतावे लागणार आहे.
Only pass holders can enter the market yard of Pune
महत्वाच्या बातम्या वाचा
- वाढत्या कोरोनाचा विद्यार्थ्यांना मोठा फटका, आता अभियांत्रिकीची ‘जेईई मेन्स’ही पुढे ढकलली
- महाराष्ट्रात तरुणाईला ग्रासले कोरोनाने, ३१ ते ४० वयोगटाला सर्वाधिक संसर्ग
- कोरोना रुग्णांसाठी तुळजाभवानी देवस्थानकडून ३०० बेडचे हॉस्पिटल, अन्य देवस्थानांकडे आता लक्ष
- “दिल्लीत हुजरेगिरी ते महाराष्ट्रद्रोही”… प्रदेश काँग्रेसच्या गडकरी, जावडेकर, गोयल, आठवलेंसह मराठी केंद्रीय मंत्र्यांवर दुगाण्या
- पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्या सभा भारतीयांच्या जीवापेक्षा मोठा आहेत का? येचुरी यांचा खडा सवाल